एक्स्प्लोर
पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण
कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भींतींना तडे पडले आहेत. त्यामुळे सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात काल दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलं आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. हे धक्के 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असल्यानं पालघरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झालाय... दरम्यान एकामागोमाग एक धक्के बसत असल्यानं प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात येत आहे.
आरोग्य विभाग आणि एनडीआरएफच्या टीमना रहिवासी भागात पाचारण करण्यात आलं आहे. तसंच कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. भुंकपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांची पडझड होत असून शाळांच्या भींतींना तडे पडले आहेत. त्यामुळे सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू
पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरुच आहे. काल दिवसभरात भूकंपाच्या 5 धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरला काल सकाळी 7 वाजता भूकंपाने पहिला तडाखा दिला. सर्व शांत होत नाही तोवर जमीन पुन्हा हादरली. या भूकंपाने पालघरकरांना अक्षरश: रस्त्यावर आणलं. लोक दुकान, घरं सोडून रस्त्यावर आले. इतकचं काय शाळेवतील विद्यार्थीही जीव मुठीत घेऊन मैदानात दाखल झाले.
पालघरला भूकंपाचे धक्के काही नवीन नाहीत. मात्र एकाच दिवसात लागोपाठच्या धक्क्यांनी मात्र कहर केला. घरांच्या भिंतीना पडलेल्या भेगांनी भूकंपाची तीव्रता दाखवली. लागोपाठच्या धक्क्यांनी भेदरलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळेत जायची हिंम्मत होत नाही.
पालघरमध्ये भूकंपाची वारंवारता, तीव्रता आणि व्यापकता ही दिवसागणीक वाढत आहे. हे वाढते धक्के मोठ्या भुकंपाची चाहूलही असू शकतात. मात्र तीन भूकंप मापन करणाऱ्या यंत्रांशिवाय सरकारने काय उपायोजना केल्या हा प्रश्न जनतेला पडला आहे.
तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.
पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम
- 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
- 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल
- 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल
- 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
- 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
- 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल
- 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
- 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
- 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement