एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेती क्षेत्रात संशोधन करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी निंबकर यांचं निधन

शेती क्षेत्रात संशोधन करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी निंबकर (Banbihari Nimbkar) यांचं आज फलटण येथील राहत्या घरी निधन झालं.

सातारा : भारतीय शेती क्षेत्रामधील प्रथम संशोधक, पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी विष्णू निंबकर (Banbihari Nimbkar) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव फलटण येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पश्चात नंदिनी निंबकर, मंजिरी निंबकर व चंदा निंबकर या तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

बनबिहारी यांचा जन्म 17 जुलै 1931 रोजी गोवा येथे झाला. त्यांनी 1956 साली फलटणात शेती बियाणांमध्ये संशोधन करून 'निंबकर सिडस्' नावाने बाजारात आणले. 1968 रोजी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचीही (नारी)  या संस्थेची त्यांनी स्थापना केली. बनबिहारी यांनी या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विशेष योगदान दिलं. त्यांचे शेती बियाणे व शेळी मेंढी पालन या व्यवसायामध्येही विशेष योगदान होते. त्यांनी बंगालमधील सुंदरबनातील शेळीमधील Booroola हा जनुक त्यांनी लोणंदच्या शेळीच्या जनुकामध्ये रुजवला. त्यातून नारी सुवर्णा नावाची शेळीची नवी जात निर्माण झाली. या शेळीची उंची अधिक असते, दख्खनी शेळीपेक्षा अधिक वेगाने तिची वाढ होते आणि तिला जुळं होण्याची शक्यता दुपटीने वाढते. साहजिकच पशुपालकाला या शेळीपासून भरपूर फायदा होतो. 

आफ्रिकेतील बोअर शेळीपासून नवी संकरीत जातही या संस्थेने विकसित केली. बोअर शेळीची वाढही वेगाने होते आणि सेंद्रीय पदार्थांचं (पाला-पाचोळा, गवत, इत्यादी) रुपांतर प्रथिनांमध्ये (मांस) करण्याची कार्यक्षमताही वाढते. नारी सुवर्णा आणि संकरीत बोअर या दोन शेळ्यांची वाणं महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यातील हजारो पशुपालकांना (यापैकी बहुतांशी धनगर), विशेषतः महिलांना पुरवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. 

निंबकर एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीट्यूटने शेतीमध्ये मूलगामी संशोधन केलं आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ केली. आधुनिक विज्ञान व समुचित तंत्रज्ञान याद्वारे ग्रामीण विकास हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. या कार्याबद्दल बी. व्ही. निंबकर आणि संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. याच कार्यासाठी बी. व्ही. निंबकर यांना भारत सरकारने 2006 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. तसेच 2016 रोजी जमनालाल बजाज अॅवॉर्ड पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget