एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
महाराष्ट्रदिनी 'पानी फाऊण्डेशन'ची मराठवाड्यात 'चला गावी' मोहीम
मुंबई : मराठवाड्यातील चार गावांमध्ये चला गावी दुष्काळमुक्तीसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 2 आणि बीड आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी अनेक गावे जलसंधारणाच्या कामासाठी, गावे पाणीदार करण्यासाठी, दुष्काळमुक्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
गावांचा हा उत्साह पाहून वेगवेगळे सिनेअभिनेतेही यात आपला सहभाग नोंदवत आहेत.स्वतः आमिर खाननं पत्नी किरण रावसह निलंगा तालुक्यात 1 दिवस पूर्ण फक्त याच गावांना भेट दिली. यावेळी अभिनेता जितेंद्र जोशीनं औरंगाबाद, ऊस्मानाबाद व बीड मधील गावांना भेटी दिल्या, तर अभिनेता अतुल कुलकर्णीनं लातूर जिल्ह्यातील श्रमदान करणाऱ्या गावाचा उत्साह वाढवण्यासाठी भेटी दिल्या आहेत.
गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना आपली शहरातली माणसंही साथ देऊ इच्छितात. त्यांच्यासाठी पानी फाऊंडेशन मार्फत सोमवारी 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘चला गावी’ मोहीम राबवण्यात येत आहे. यात शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन गावात श्रमदान करावं, असं आवाहन पानी फाऊण्डेशन आणि आमिर खान यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
पानी फाऊण्डेशनच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणं आवश्यक आहे.
www.paanifoundation.in/1May
या नोंदणी नंतर आपण कोणत्या गावात जाता येईल हे ठरवू शकता. तिथल्या एका गावकरी मित्राचा नंबरही आपल्याला पाठवण्यात येईल.
मराठवाड्यातील या गावांना होणार चला गावी मोहीम साजरी
1) किनगाव, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद
2) पळसखेडा, ता. केज, जि. बीड
3) वाठवडा, ता. कळंब, जि. औरंगाबाद
4) दावतपूर, ता.औसा, जि. लातूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement