एक्स्प्लोर
भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचा अपघाती मृत्यू
उस्मानाबाद : भाजपचे उस्मानाबादचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिल मंजुळे यांचं अपघाती निधन झालं. बीडमध्ये लग्नसमारंभ आटोपून उस्मानाबादला जाताना त्यांच्या गाडीला एसटीने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अनिल मंजुळे यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या तिघांना या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर उस्मानाबादमध्ये व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अनिल मंजुळे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता.
दरम्यान अनिल मंजुळे यांच्यावर त्यांच्या वाघोली येथील घरी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुले असा परिवार आहे.
अनिल मंजुळे यांनी उस्मानाबाद नगरपालिकेची तीन वेळा निवडणूक लढवली होती. 2006 च्या निवडणुकीत त्यांना अवघ्या सात मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. आठ दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिकेत भाजपाच्या तिकिटावर ते निवडून आले.
मनसेचे ते सलग दहा वर्ष जिल्हाध्यक्ष होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement