एक्स्प्लोर

मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात

उस्मानाबाद/मुंबई: उस्मानाबादच्या कोंडमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी एका आईनं सौभाग्याचं लेणं अर्थात मंगळसूत्र गहाण ठेवूनही तीचं शिक्षण अर्धवट राहिलं. याबाबतची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर, समाजातील संवेदनशील माणुसकीचा झरा मदतीच्या रुपाने धावला आहे.   कोंडमधील सुरेखा जाधव यांच्या कुटुंबाला आता आर्थिक मदत मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे एबीपी माझाची बातमी पाहून, जाधव कुटुंबीयांना देश-विदेशातून मदतीचा हात मिळत आहे. सुरेखा यांची मुलगी प्रगतीच्या शिक्षणासाठी आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळाली आहे.  इतंकच नव्हे तर धान्य, कपडे यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.   मंगळसूत्र गहाण ठेवून मिळालेले 1200 रुपये मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केले. मात्र तेही न पुरल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं होतं.   कोणाकडून किती मदत?   'जिवाचे जिवलग' या व्हॉट्सअप ग्रुपने 14 हजार रुपयांची मदत केली. या ग्रुपचे अडमीन संतोष पाटील हे ओमान, मस्कतला असतात. तर ग्रुपमधील सदस्य विजय भोरे अमेरिकेत, विलास शिंदे फ्रान्सला असतात. याशिवाय जनार्धन सुरवसे, किरण वाघे  (सोलापूर ),विरेंद्र एखंडे (मुंबई ),प्रदीप बारखडे ( अंबरनाथ ),बाबासाहेब सोनवणे, राहुल कावळे, राहुल थोडेसरे,नितीन शिंदे,तुळशीदास खोत,प्रतिक पाटील या सर्वांनी मिळून 14 हजार रुपये दिले.   याशिवाय *प्रमोद सावंत-जागजी--२००० *मनभाव ढोकी पी आय --२००० *अकोस्कर मंडळ अधिकारी --१००० *आयुब शिकलकर येडसी --५०० *अमजद पठाण पोलीस ---५०० *सोमनाथ तडवळकर --२५ किलो ज्वारी *झुंजार क्रांती सेना लोहारा --शिलाई मशिन *हरी खोटे तेर--१० वीच्या मुलीसाठी वह्या व साहित्य *नरेंद्र सिंग होडे श्रीरामपूर -- २००० *हैबत पाटील सांगली --१०००० *क्रांती सेना कोल्हापूर ---कुठुंबची भेट घेऊन मदत करणार *भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्था ---५००० *कोंड आरोग्य केंद्र --डॉ. संग्राम पाटील --5000 *सौदी, फ्रांसच्या मराठी तरूणांचा ग्रुप जीवाचे जिवलग ग्रुप --१४००० रु   काय आहे प्रकरण? उस्मानाबादच्या कोंडमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी एका आईचं सौभाग्याचं लेणं अर्थात मंगळसूत्र अवघ्या बाराशे रुपयात एक वर्षापूर्वी सोनाराकडे गहाण ठेवलं आहे. दुर्देवं असं की मंगळसूत्र गहाण ठेवूनही पैश्याअभावी मुलीचं शिक्षण थांबलचं. दुष्काळामुळं या घरात चटणीसुध्दा खायला उरलेली नाही.   पदवीधर सुरेखा जाधव यांनी गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराकडं गहाण ठेवलं. त्यातून मिळालेल्या बाराशे रुपये थोरल्या मुलीच्या इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी दिलं. मात्र बाराशे रुपये कितपत पुरणार? तरीही सुरेखा यांची मुलगी प्रगतीने हे 1200 रुपये सहा महिने पुरवले. मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात सुरेखाचं दुर्देव असं की मंगळसूत्र गहाण ठेवून आलेल्या बाराशेत प्रगतीच्या शिक्षणाचा सहाचं महिन्याचा खर्च भागला. पैसे नाहीत म्हणून दिवाळीत प्रगती लातूराहून गावी परत आली. शिक्षण थांबलं ते थांबलचं.   सुरेखाचं सौभाग्य, त्यांचे पती बुध्दानंद चार वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. शेतातल्या डिपीवर फ्यूज टाकण्यासाठी गेले, तेव्हा वीजेचा धक्का लागून बुध्दानंदची ही अवस्था झाली. बुध्दानंदच्या उपचारासाठी लोकांनी पै-पै दिले. ग्रामपंचायतीनं पाच हजाराची मदत केली होती.   शाळेतील खिचडी पुरवून घरी   नवरा अंथरुणाला खिळल्यापासून सुरेखाच घरच्या कर्त्या करवित्या. चार मुलं आणि पतीचं पालन- पोषणाचा एकमेव हात. जमीन अडीच एकर..माळरानाची..त्यात चार वर्षापासूनचा दुष्काळ. त्यामुळं आज या घरात खायला मीठ शिल्लक आहे. तीनं मुलं घरी सकाळी थोडसं जेवण करतात. शाळेत जावून खीचडीवर पोट भरतात. शाळेतून डब्यात आणलेली खिचडी वाचवून रात्री खातात. मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात सुरेखाची दुसरी मुलगी..प्रीतीनं गेल्यावर्षी टँलेंट हंट स्पर्धेत जिल्ह्यात पहिला नंबर मिळवला. यावर्षी प्रीती दहावीला आहे..शेजारची मुलगी झोपली की पुस्तके उसणे आणून अभ्यास करते...पहाटेपर्यंत...रस्त्यावरच्या सौरउर्जेत.   दुष्काळानं घराचं सगळे वासे उस्कटून टाकलेत. शिवारात काम करावं तर दुष्काळामुळं शेतात काम नाही. सरकार रोजगार हमीची काम सुरु करत नाही. काम करायची इच्छा असली तरी सुरेखा सारखी माणसं जातील कुठं? VIDEO:  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget