एक्स्प्लोर
तुळजापुरात पुजाऱ्याकडून मारहाण, भाविकाची तहसीलदारांकडे तक्रार
![तुळजापुरात पुजाऱ्याकडून मारहाण, भाविकाची तहसीलदारांकडे तक्रार Osmanabad Devotee Beaten Up By Priest In Tuljabhavani Temple तुळजापुरात पुजाऱ्याकडून मारहाण, भाविकाची तहसीलदारांकडे तक्रार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/09091927/tuljapur_temple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. राजेंद्र विष्णू भोकरे असं या भाविकाचं नाव आहे.
आज सकाळी ही घटना घडली. तुळजाभवानीच्या अभिषेकावेळी विवेक पाटील नावाच्या पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप राजेंद्र विष्णू भोकरे यांनी केला आहे.
राजेंद्र भोकरे यांनी या सगळ्या प्रकाराची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. तर राजेंद्र भोकरेंच्या तक्रारीनंतर तुळजापूर पोलिसांतही गुन्हा दाखल झाला आहे. भोकरे हे मूळचे औरंगाबादचे आहेत.
"रांगेत असताना मागच्या लोकांचा धक्का लागल्याने पुढे आलो आणि हातातील दही पडलं. त्यामुळे पुजाऱ्याने आधी थोबाडात मारली. नंतर मी माफी मागूनही पुजाऱ्याने मोठ्या आवाजात दम भरत मारझोड केली," असा आरोप राजेंद्र भोकरे यांनी तक्रारीत केला आहे. तसंच पुजाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
![Tuljabhavani_Devotee_Complaint](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/09144627/Tuljabhavani_Devotee_Complaint1.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)