एक्स्प्लोर
Advertisement
डिजिटल सिग्नेचर असलेले सात-बारा उतारे मार्चपासून
मुंबई : सध्या राज्यात जिथे तिथे ऑनलाईन सात-बारा उतारा मागितला जात असला तरी शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सातबारा उतारा मिळवणं ही मोठी जिकीरीची बाब आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड, वीज अशा सुविधांचा अभाव आहे. त्यातही ऑनलाईन सात-बारा उताऱ्याची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा कोर्टाच्या कामकाजात आहे तसा वापरता येत नाही. त्यावर पुन्हा तलाठ्याचा सहीशिक्का आवश्यक असतो. त्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे जावंच लागतं. एकूणच ऑनलाईन सात-बारा उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी ऑनलाईन सात-बारा सक्तीचा करण्यात आलाय.
शेतकऱ्यांच्या या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा मिळायला मार्च महिन्यापासून सुरूवात होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. इन्कमटॅक्स रिटर्न प्रमाणे हा सात-बारा उतारा डिजीटल सिग्नेचर केलेला असेल, असंही पाटील यांनी सांगितलं.
कोणत्याही शेत जमिनीची अथवा बिगरशेती प्लॉटची मालकी सिद्ध करण्यासाठी सात-बारा उतारा हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी कार्यालये, बँका आणि कोर्ट कचेऱ्याच्या कामात या सात-बारा उताऱ्याचं महत्व अनन्यसाधारण आहे.
सात-बारा उतारा गावकामगार तलाठ्याकडून मिळवावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून सात-बारा उतारा महाभूमिलेखच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावा लागतो. त्यात अनेक त्रुटी असल्या किंवा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काची शासकीय संगणकात नोंद झालेली नसली तरी ऑनलाईन उतारा अनेक ठिकाणी सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र त्यातील सर्वात महत्वाची त्रुटी म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर "या उताऱ्याची प्रत शासकीय, बँका तसंच कोर्टाच्या कामकाजासाठी ग्राह्य धरली जाणार नाही" असा वैधानिक इशारा असतो. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून सात-बारा उताऱ्याच्या ऑनलाईन प्रिंटवर तलाठ्याचा सही शिक्का आणण्याचा पर्याय देण्यात आला.
आता मार्च महिन्यापासून मिळणार असलेल्या डिजिटल सिग्नेचरने युक्त सात-बारा उतारा सहीशिक्क्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर
Advertisement