एक्स्प्लोर

मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे...!, 1 हजार झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा

अकोला: अकोला जिल्ह्यातील खैरखेड गावात आज एक अनोखा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस तुमच्या-आमच्या दररोजच्या वाढदिवसासारखा नक्कीच नव्हता. कारण, त्यात निसर्गसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा एक 'विचार' अन कृतीशीलते'चा परिपाठही होता. खैरखेड गावात गेल्या वर्षी 20 ऑक्टोबरला एकाच दिवशी 1 हजार झाडे लावण्यात आली. गावकरी फक्त वृक्षारोपण करुनच थांबले नाहीत. तर गावातील प्रत्येकाने ते झाड जगविण्यासाठी कंबर कसली. हजारावर लोकसंख्या असलेल्या या गावात प्रत्येक व्यक्तीला एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येकाने वर्षभर या झाडाला पाणी आणि खते देऊन वाढविले. आज ही झाडं एक वर्षांची झाल्याने हा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या झाडांसाठी आजच्या वाढदिवसासाठी एक 'खास केक'ही बनविण्यात आला होता. हा केक अडीच क्विंटल गांडूळ खताचा होता. हा केक अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते कापण्यात आला. या कार्यक्रमासाठी सारी प्रशासकीय यंत्रणाच आज खैरखेडमध्ये उपस्थित होती. वर्षभरापूर्वी आपल्या हाताने लावलेली झाडे मोठी झाल्याचे पाहून, जिल्हाधिकारीही आनंदित होते. त्यांनी गांडूळ खताचा केक झाडांना टाकून त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडिओ

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget