एक्स्प्लोर
महायुतीत आणखी एका पक्षाची मोट, जनसुराज्यचा समावेश होणार
मुंबई : महायुतीत आणखी एक पक्ष दाखल होण्याच्या तयारीत आहेत. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील होणार आहे. महायुतीत शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, स्वाभिमानी आणि शिवसंग्राम पक्ष आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपबरोबर युती करणार आहे.
मुंबईत उद्या यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. विनय कोरे हे वारणा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असून दूध आणि साखर व्यवसायात त्यांचा जम बसला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे.
विनय कोरे यांनी अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी निभावली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement