एक्स्प्लोर
राष्ट्रवादी काँग्रेसने हाकललेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी
नवी मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसने परंपरेप्रमाणे आणखी एका प्रामाणिक अधिकाऱ्याला रस्ता दाखवला. आज नवी मुंबई पालिकेत सभागृह नेते जयवंत सुतार यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. हा प्रस्ताव 104 विरुद्ध 6 मतांनी पारीत झाला.
तुकाराम मुंढेंवर नाराजीची कारणं
तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईचा कारभार हातात घेतल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांचं धाबे दणाणले होते.
महापालिकेने मोरबे धरणाजवळ 163 कोटी खर्चून सोलार प्रोजेक्ट उभारण्याची तयारी केली होती. या प्रकल्पाच्या पुढील 25 वर्षांच्या देखभालीचा खर्च 125 कोटी रुपयांवर जाणार होता.
प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेचा प्रतियुनिट खर्च 8 रुपये 50 पैसे इतका होता.इतक्या महाग वीजेला मार्केटमध्ये कुणीही खरेदीदार मिळणार नाही. त्यामुळे मुंढेंनी हा प्रस्ताव फेटाळला.
आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे
त्याशिवाय 19 कोटी खर्चून आंबेडकर भवनाच्या डोंबवर मार्बल बसवण्याची घोषणा केली. आयआयटीकडून मागवलेल्या अहवालात मार्बल टाईल्स बसवण्याची गरज नसल्याचं समोर आलं. त्यामुळे तुकाराम मुंढेंनी त्या प्रकल्पावरही फुल्ली मारली. ठाणे, बेलापूर आणि पाम बीच रस्त्यावर अँब्युलन्स तैनात करण्याची योजना आहे. ज्याचा 5 वर्षाचा खर्च 18 कोटी रुपये आहे. याशिवाय अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवल्यानेही नगरसेवक आणि विशेषत: राष्ट्रवादी मुंढेंवर नाराज होती. प्रॉपर्टी टॅक्स घोटाळ्यातून सुटण्यासाठी मुंढेंवर अविश्वास? तुकाराम मुंढेंबाबत राष्ट्रवादीच्या मनात अढी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचा घोटाळा हे आहे. गेल्या 10 वर्षात टॅक्स न भरताच बिल्डरांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून पालिकेचं किमान 10 हजार कोटीचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांना तुकाराम मुंढे यांनी निलंबितही केलं. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली. ज्यात सत्ताधारी अडकण्याचीही भीती आहे. राष्ट्रवादीने प्रामाणिक अधिकाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी श्रीकर परदेशी, सुनील केंद्रेकर, चंद्रकांत गुडेवार अशा आयएएस अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या मदतीला शिवसेना, काँग्रेस आणि छुप्या पद्धतीने भाजपही धावली असल्याचं चित्र आहे. संबंधित बातम्याःआयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर
सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर
तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह
आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव
…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!
नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम
नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई
तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement