एक्स्प्लोर
एसीचा धूर वरच्या मजल्यावर गेल्याने गुदमरुन वृद्धाचा मृत्यू
वसई : एसी कॉम्प्रेसरमध्ये आग लागून धुरात गुदमरुन एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसईत समोर आली आहे. 9 महिन्यांच्या चिमुरड्यासह दोघे जण बेशुद्ध पडले होते.
वसईच्या एव्हरशाइन परिसरातील सॅवियो सोसायटीत ए विंग मधील रुम नंबर 203 मध्ये सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एसी कॉम्प्रेसरमधून धूर येऊ लागला.
एसीचा धूर वरच्या मजल्यावरील 303 या रुम मध्ये गेल्याने रहिवासी उदय मोहन कांचे आणि त्यांचा 9 महिन्याचा मुलगा पारस गुदमरुन बेशुद्ध पडले. तर पाहुणे म्हणून आलेले उदयचे 62 वर्षांचे मामा जयंत देशकर यांना यात जीव गमवावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement