एक्स्प्लोर
Advertisement
Exclusive | 'राममंदिरासाठी एक कोटी ट्रान्सफर केले', उद्धव ठाकरेंनी ट्रस्टला लिहिलेलं पत्र 'माझा'च्या हाती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 27 जुलै रोजी राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिल्याचं पत्रात नमूद केलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 27 जुलै रोजी राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिल्याचं पत्रात नमूद केलं आहे. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचं पत्रात लिहिलं आहे. तसंच माझीही प्रभू रामावर श्रद्धा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय आरटीजीएस क्रमांक आणि बॅंकेची माहिती या पत्रात लिहिली आहे.
शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून 27 जुलैला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दान ट्रस्टकडे जमा केल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. 28 तारखेला हे पैसे जमा झाल्याची पोहोच देखील आली असाही दावा त्यांनी केला आहे.
माझाच्या हाती लागलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिर ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 5 ऑगस्टला राममंदिर निर्माणाच्या कार्याचा श्रीगणेशा होत आहे. जगातील कोट्यवधी हिंदू बांधव या क्षणाची चिरकाल प्रतीक्षा करत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारों शिवसैनिकांनी अयोध्या आंदोलनात भाग घेतला. माझीही श्रीरामावर अगाध श्रद्धा राहिली आहे. संत तुलसीदासांनी म्हटलंय, ' बिनु सेवा जो द्रवै दीनपर राम सरिस कोउ नाहीं.
मी शिवसेनेकडून राममंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्या घोषणेप्रमाणे 27 जुलैला ही रक्कम आरटीजीएस केली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
राममंदिरासाठी शिवसेनेच्या एक कोटीच्या घोषणेवर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणाले, आतापर्यंत तरी पैसे आले नाहीत!
अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी केली होती घोषणा
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली होती. मला स्वप्नातही वाटलं नव्हत की मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असं ठाकरे म्हणाले होते.
VIDEO | काय म्हणाले महंत नृत्य गोपाल दास
भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
हे ही वाचा-
Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement