एक्स्प्लोर

3 November In History : औरंगजेबचा जन्म आणि रशियाने लायका कुत्री अंतराळात पाठवली; आज इतिहासात

On This Day In History : 'मुघले आझम' या चित्रपटातील अकबराची भूमिका आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता. 

मुंबई: मानवाची जिज्ञासू वृत्ती अशी आहे की जी त्याला कधीही शांत बसू देत नाही. त्यातून रोज नवनवे शोध लागतात. मानवाने सुरुवातीला आपल्या रोजच्या जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टींचा शोध लावला. त्यानंतर आकाशाला गवसणी घालण्यासाठी विमानाचा शोध लावला. नंतर त्याच्याही पुढे जाऊन अंतराळात पाऊल ठेवलं. त्याचा पहिला प्रयोग म्हणून 3 नोव्हेंबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने लायका नावाची एक कुत्री अंतराळात यशस्वीपणे पाठवली. अशा प्रकारे सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिलाच सजीव पाठवला, त्यामुळे मानवाचा अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

1618- मुगल सम्राट औरंगजेबचा जन्म

मुगल साम्राज्याचा सहावा सम्राट औरंगजेब (Aurangzeb) याचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी झाला. औरंगजेब 1636 ते 1644 दक्षिणेचा, 1645 ते 1648 गुजरातचा, 1648 ते 1652 मुलतानचा आणि शेवटी 1652 ते 1657 पुन्हा दक्षिणेचा सुभेदार होता. दक्षिणेत पहिल्यावेळी सुभेदार असताना, त्याने बागलाण जिंकले, शहाजी महाराजांचा पराभव करून त्याने अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. 

औरंगजेब आपल्या भावांचा पराभव करुन 1658 रोजी दिल्लीच्या सिंहासनावर बसला. मुराद, दारा, शुजा, सुलैमान, शुकोह यांचा खून केल्यानंतर जून 1659 मध्ये त्याचे राज्यारोहण झाले. औरंगजेबने दक्षिणेचे स्वराज्य जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले, पण मराठे काही त्याच्या हाती लागले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो दक्षिणेच्या स्वारीवर आला. त्याला या ठिकाणी तब्बल नऊ वर्षे छत्रपती संभाजी महाराजांशी झुंजावं लागलं. त्यानंतरही महाराणी ताराराणींनी त्यांना झुंजवलं.

औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या 91 व्या वर्षी, म्हणजे 1907 साली महाराष्ट्राच्या (भिंगार) अहमदनगर येथे झाला. त्यांची कबर खुलताबाद येथे आहे. 

1906- पृथ्वीराज कपूर यांचा जन्मदिन 

भारतीय चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा आजच्या दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 1906 रोजी जन्म  झाला. आपल्या भारदस्त आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली. त्यांचे 'अलेक्झांडर द ग्रेट' आणि 'मुघले आझम' हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. मुघले आझम या चित्रपटातील त्यांची अकबराची भूमिका आजरामर ठरली.

1933- डॉ. अमर्त्य सेन यांचा जन्मदिन 

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन (Amartya Sen) यांचा जन्म आजच्या दिवशी, म्हणजे 3 नोव्हेंबर 1933 रोजी झाला. 'कल्याणाभिमुख अर्थशास्त्र आणि सामाजिक पर्याय सिद्धान्त' या विषयांतील कार्यासाठी 1998 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले.

गरिबी ,आरोग्य ,शिक्षण, मानवी  विकास आणि एकूणच मानवी कल्याण हा त्यांच्या विचाराचा गाभा आहे. केंद्र शासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अमर्त्य सेन हे 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

1957- सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिला सजीव पाठवला 

अंतराळात यान पाठवल्यानंतर सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिला सजीव पाठवला. 3 नोव्हेंबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने लायका नावाची एक कुत्री अंतराळात यशस्वीपणे पाठवली. अशा प्रकारे सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिलाच सजीव पाठवला, त्यामुळे मानवाचा अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

1992- बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष 

राष्ट्रपती जॉर्ज एच डब्लू बुश यांचां पराभव करुन बिल क्लिंटन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 3 नोव्हेंबर 1992 रोजी बिल क्लिंटन हे अमेरिकेचे 42 वे अध्यक्ष बनले. नंतरच्या काळात त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांना निवडून यायची किमया केली. पण त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे अमेरिकेत खळबळ माजली. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात खळबळ माजवणाऱ्या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेम प्रकरणाचा खुलासा (US President Bill Clinton Monica Lewinsky Sex Scandal) झाला. 21 सप्टेंबर 1998 रोजी या दोघांच्या प्रेम प्रकरणाचा व्हिडीओ लोकांसमोर आला. त्यानंतर यावर बिल क्लिंटन यांनी ज्युरी समोर यासंबंधी आपला जबाब दिला. हा जबाब सर्व माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर बिल क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

2004- अफगाणिस्तानमध्ये हमिद करझाई राष्ट्रपतीपदी 

अफगाणीस्तानमध्ये 2004 साली राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये 3 नोव्हेंबर 2004 रोजी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी हमिद करझाई यांची निवड करण्यात आली. 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Horoscope Today 23 January 2025 : आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा गुरुवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget