एक्स्प्लोर

Yuva Sena: युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; पुण्यात युवासेनेला बळ, नव्या नियुक्त्या जाहीर

पुणे शहरातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

Pune News : पुणे (Pune) शहरातील युवासेनेचे (Pune Yuvasena) पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आदेशाने पुण्यात नव्या नियुक्त्या केल्या आहेत. मात्र सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहे. पुण्यातील काही युवा सेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शहर युवा अधिकारी, शहर समन्वयक, शहर चिटणीस, उपशहर युवा अधिकारी, विधानसभा युवा अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर अनेकांना संधी देण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडल्यानंतर शिवसेनेने पुन्हा पक्षबांधणीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. युवासेनेत मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून  सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पद, पदाधिकाऱ्याचे नाव आणि कार्यक्षेत्र  कोणतं?
शहर युवा अधिकारी जाहीर केले आहे. त्यात राम थरकुडे (कोथरूड, कसबा, शिवाजीनगर व खडकवासला विधानसभा), सनी गवते (वडगावशेरी, कॅण्टोन्मेंट, हडपसर व पर्वती विधानसभा), शहर समन्वयक : युवराज पारिख (कोथरूड, कसबा, शिवाजीनगर व. खडकवासला विधानसभा), प्रसाद बाबर (वडगावशेरी, कॅण्टोन्मेंट, हडपसर व पर्वती विधानसभा),शहर चिटणीस : निरंजन दाभेकर, अक्षय माळकर, उपशहर युवा अधिकारी : मयूर भांडे (शिवाजीनगर, कोथरूड), विकास बधे (कसबा, हडपसर), अक्षय फुलसुंदर (पर्वती, कॅण्टोन्मेंट), शिवप्रसाद जठार (वडगावशेरी, खडकवासला), उपशहर समन्वयक : आनंद भिलारे, मयूर पवार, परेश खांडके, कमलेश मानकर, चेतन चव्हाण, विधानसभा युवा अधिकारी: अमर कामठे (हडपसर विधानसभा), सोनू पाटील (वडगावशेरी विधानसभा), आकाश जगताप (कॅण्टोन्मेंट विधानसभा), शुभम दुगाणे (कसबा विधानसभा), गौरव पापळ (पर्वती विधानसभा), हर्षद मांजळकर (शिवाजीनगर विधानसभा),रुपेश थोपटे (खडकवासला विधानसभा), वैभव दिघे (कोथरूड विधानसभा) या सगळ्यांचा समावेश आहे. 

युवासेना मजबूत करण्याची तयारी 
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यात अनेक शहरात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक तरुण शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी पुण्यात या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget