एक्स्प्लोर

OBC Reservation : महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार का?, 19 जुलैला होणार फैसला

OBC Political Reservation : महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळणार का या प्रश्नाचं उत्तर 19 जुलैला मिळणार आहे. सोबतच 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होण्याची शक्यता अजूनही कायम आहे. 

नवी दिल्ली: महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) मिळणार का? बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता 19 जुलैला मिळणार आहेत. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचा आदेशही जारी केला आहे. 

आज काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?
ज्या ठिकाणी निवडणूक अधिसूचना निघालेली आहे त्यात आता हस्तक्षेप होणार नाही. पण ज्या ठिकाणी अधिसूचना निघालेली नाही, तिथे मात्र तूर्तास कुठली नवी अधिसूचना नको. मंगळवारी 19 जुलैला आम्ही या सगळ्याबाबत पुढची सुनावणी करु असं कोर्टानं म्हटलं आहे. 

बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सादरही केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं ज्या ट्रिपल टेस्टची पूर्तता करायला सांगितलं आहे, त्याच आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय हा रिपोर्ट असल्याचा सरकारचा दावा आहे. 

सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिल्यानंतर तो 92 नगरपरिषदांच्या जाहीर निवडणुकांसाठी लागू होणार की नाही याबाबत संभ्रम होता. कारण या निवडणुकांचं नोटफिकेशन 20 जुलैला निघणार आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचे वकील, सॉलिसिटर जनरल यांनीही या संभ्रमावर काही काळ चर्चा केली. त्यानंतर हे स्पष्ट झालं की आजचा आदेश या 92 नगरपरिषदांसाठी लागू नसेल. 19 जुलैला काय होतं यावरच 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरेल. त्यावरच राज्यात मुंबई, पुणे, नागपूरसह 20 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचंही भवितव्य अवलंबून असेल. 

मध्य प्रदेश सरकारनं केलेला रिपोर्ट ग्राह्य धरत सुप्रीम कोर्टानं तिथे मे महिन्यात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला. मग महाराष्ट्रात ते का लागू होत नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर बांठिया आयोगाच्या अहवालाकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय हा रिपोर्ट करण्यात आला आहे. 

बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला गेला तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या अहवालानुसार महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 37 ते 40 टक्क्यांच्या आसपास आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसंख्येनुसार जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण लागू करण्यात यावं अशी शिफारस आयोगानं केली आहे. 

शिंदे फडणवीसांचं नवं सरकारही ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका नकोत याच मताचं आहे. प्रसंगी निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करु असे संकेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दिले होतेच. त्यामुळे आता 19 जुलैला सुप्रीम कोर्ट काय करतंय आणि  ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली तर निवडणुका कुठल्या वेळेला होणार हे पाहणं महत्वाचं असेल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: निवडणूक आयोग पक्षपाती, मतदार यादीत गोंधळ; Ambadas Danve यांचा घणाघात
Election Commission PC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान
Maha Civic Polls: राज्यातील रखडलेल्या निवडणुका जाहीर, २ डिसेंबरला मतदान
Polls Without VVPAT: ‘या निवडणुकीमध्ये VVPAT चा वापर करणार नाही’, निवडणूक आयोगाची घोषणा
Voter List Row: मतदार यादीत दुबार नावांचा गोंधळ, जबाबदारी कुणाची?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Embed widget