एक्स्प्लोर

डिजिटल स्वाक्षरीसह एक मेपासून सातबारा ऑनलाईन

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमाअंतर्गत हे काम सुरु करण्यात आले होते. सातबारा, ई-फेरफार मूळ हस्तलिखित अभिलेख आणि अद्ययावत संगणीकृत डाटा यांची तंतोतंत जुळणी करण्याच काम सुरु होतं. आता शेतकऱ्याला त्याचा सातबारा सहजरित्या मिळणार आहे.

कोल्हापूर : राज्यातील शेतकर्‍यांना एक मे पासून ऑनलाईन सातबारा देण्यात येणार आहे. शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेतला होता. राज्यात 43 हजार 948 महसुली गावे आहेत. यामधील आता संगणीकरणाच काम अंतिम टप्यात असून एक मे पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, साताबाराच्या ऑनलाईन प्रिंटवर डिजिटल सिग्नेचरसह सातबारा उतारा असणार आहे. नागरिकांचा वेळ, पैशांची बचत आणि जगाच्या पाठीवरुन कुठेही सातबारा कुठल्याही त्रासाविना नागरिकांना उपलब्ध व्हावा, असा प्रमुख उद्देश आहे. जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात आणि विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा. जमिनीची माहिती ज्यामध्ये असते, त्याला गाव नमुना असही म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी एक ते एकवीस अशी विभागणी केलेली असते. त्यातील सात नंबरचा नमुना मालकी हक्काबाबत असतो, तर 12 नंबरमध्ये पिकासंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण सातबारामध्ये केलेले असते. कोणत्याही शेतजमिनीची किंवा बिगरशेती प्लॉटची मालकी सिद्ध करण्यासाठी सातबारा उतारा हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. सरकारी कार्यालय, बँका, कोर्ट-कचेऱ्याच्या कामात, कर्ज प्रकरणी  सातबारा उताऱ्याचं असावाच लागतो. चार ते पाच गावांना एकच तलाठी असल्यानं मागणी केलेला सातबारा शेतकऱ्याला वेळेवर उपलब्ध होत नव्हता. कर्ज काढताना सेवा सोसायट्या सातबारा मागतात. तलाठी ते कर्ज प्रकरण मंजूर होईपर्यंत कालावधी जास्ती जात असे, वेळेवर पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होत असे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमाअंतर्गत हे काम सुरु करण्यात आले होते. सातबारा, ई-फेरफार मूळ हस्तलिखित अभिलेख आणि अद्ययावत संगणीकृत डाटा यांची तंतोतंत जुळणी करण्याच काम सुरु होतं. आता शेतकऱ्याला त्याचा सातबारा सहजरित्या मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News: 'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याच्या मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याच्या मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
Embed widget