एक्स्प्लोर

नोटाबदली रॅकेटशी संबंध नाही, माध्यमांनी पराचा कावळा केला : महंत सुधीरदास

नाशिक : नाशिकमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्याच्या आरोपानंतर महंत सुधीरदास आणि छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर पहिल्यांदाच 'एबीपी माझा' समोर आले आहेत. आयकर विभागाने आजही या दोघांची चार तास चौकशी केली. पैसे बदलून देणाऱ्या रॅकेटशी कोणताही संबंध नाही. माध्यमांनी पराचा कावळा केला, असा दावा महंत सुधीरदास यांनी केला आहे. आयकर विभागाने फक्त साक्षीदार म्हणून बोलवलं होतं, असंही चे म्हणाले. काय आहे प्रकरण? नाशिकजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरानगर परिसरातील साईछाया या नामांकित हॉटेलमध्ये एक प्रसिद्ध व्यापारी, राजकीय महंत सुधीरदास आणि छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर नोटाबदलीसाठी भेटणार असल्याची टीप आयकर विभागाला मिळाली. त्यानुसार आयकरच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आणि मध्यरात्रीच तिघांना ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन बॅगा भरुन नोटा सापडल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर नोटा मोजण्यासाठी आणलेलं मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. पण या तिघांकडून नेमक्या किती जुन्या आणि किती नव्या नोटा जप्त झाल्या? चौकशीत या तिघांनी काय माहिती दिली हे सगळं अजूनही गुलदस्त्यात आहे.  

नाशकात कोट्यवधींच्या नोटाबदली प्रकरणी राजकीय महंत जाळ्यात?

  कोण आहेत महंत सुधीरदास पुजारी? महंत सुधीरदास पुजारी नाशिकमधलं बडं प्रस्थ आहे. महंत सुधीरदास हे काळाराम मंदिराच्या पुजारी घराण्याशी संबंधित आहेत. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीकडून महंत सुधीरदास लोकसभा निवडणूकही लढले. अध्यात्मिक, राजकीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महंतांचा वावर असतो. सुटाबुटातलं चकाचक राहणीमान यामुळे महंत नाशिकमध्ये कायम चर्चेत असतात. त्यामुळे नोटाबदली प्रकरणात महंत आयकरच्या जाळ्यात अडकल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. विलास पांगारकर कोण? विलास पांगारकर हा छावा या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.  सिन्नर तालुक्यातील पांगरी हे विलास पांगारकरचं मूळ गाव. कधीकाळी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा पांगारकर आता पजेरोमधून फिरतो.शांतीगिरी महाराजांचा जवळचा शिष्य म्हणूनही विलास पांगारकरची ओळख आहे. विलास पांगारकरनं जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं. पांगारकरचा नोटाबदली प्रकरणात विलास पांगारकरची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय आतापर्यंत कोणाकोणाच्या किती कोटींच्या नोटा बदलण्यात आल्या आहेत? याचीही चौकशी सुरु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget