एक्स्प्लोर

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली

पावसानं दडी दिल्यानं पीकं करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाची माती झाली असून, उभ्या पिकात नांगर फिरवण्यावाचून शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही.

लातूर: भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पावसानं दडी दिल्यानं पीकं करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाची माती झाली असून, उभ्या पिकात नांगर फिरवण्यावाचून शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली चाकूर तालुका हा कोरडवाहू तालुका म्हणून ओळखला जातो. खरिपाच्या मोसमात तालुक्यात सर्वात जास्त पेरा हा सोयाबीनचा केला जातो. सोयाबीनसोबत मूग, उडीद ही पीकंही घेतली जातात. शिवाय जानवळ परिसरात टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेती आणि शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानं पेरा वाढला. पीकंही चांगली आली. पण पावसाने ऐनवेळी दडी दिल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी पीकं वाचवली. पण उत्पन्नात मोठी  घट होणार आहे. सरकारकडून पंचनामे करण्याचे आदेश आलेले नाहीत. पण आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं चाकूर तालुक्याचे तहसीलदार भारत सूर्यवंशी यांनी सांगितलं. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू शकतो. कारण तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा अत्यल्पसाठा आहे. पावसाळ्याचे उरलेले दिवस आणि परतीचा पाऊस यावरच पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. एकूणच पाऊस पडला नाही तर दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Sindhudurg Kankavli Crime News: महिला हवालदार स्मिता मानेंचा संशयास्पद मृत्यूने कोकणात खळबळ; पोलीस कॉन्स्टेबल सचिनला अटक, नेमकं काय घडलं?
महिला हवालदार स्मिता मानेंचा संशयास्पद मृत्यूने कोकणात खळबळ; पोलीस कॉन्स्टेबल सचिनला अटक, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Embed widget