एक्स्प्लोर
दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे-नामदेव शास्त्री आमने-सामने येणार?
येत्या 30 सप्टेंबरला दसरा आहे. परंतु भगवान गडावर पारंपरिक वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कोणत्याही व्हीआयपीला निमंत्रित केलेलं नाही.
अहमदनगर : दसरा मेळाव्यावरुन यंदाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आमने-सामने येणार आहेत. कारण कुठल्याही राजकीय नेत्याला, व्हीआयपीला 30 सप्टेंबरला गडावर कार्यक्रम घेण्यास ट्रस्टने एकमताने मनाई केली आहे. त्यामुळे यंदाही पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्याचं भाषण गडाच्या पायथ्याला होण्याची शक्यता आहे.
येत्या 30 सप्टेंबरला दसरा आहे. परंतु भगवान गडावर पारंपरिक वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कोणत्याही व्हीआयपीला निमंत्रित केलेलं नाही. त्याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक सभा आणि मेळावा आयोजित करण्यात आला नाही. संस्था स्वायत्त असून गडावर सभा, मेळावा न घेण्याचा ठराव ट्रस्टने एकमताने मंजूर केला आहे.
भगवान गडाचे सर्व धर्माचे आणि राजकीय पक्षाचे अनुयायी आहेत. त्यामुळे परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे, अशा आशयाचं निवेदन भगवान गडाच्या वतीने मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement