Maharashtra Political Crisis : आम्ही सध्यातरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत, भाजपच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात भाजप आणि शिंदे गट सरकार स्थापन करेल का? तसंच फ्लोवर टेस्टची मागणी भाजप करणार का? याबद्दल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं मत दिलं आहे.
Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) फायदा उचलून भाजप(BJP) बंडखोर आमदारांसोबत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरु असताना याबाबत भाजपच्या कोअर कमिटीत नेमका काय निर्णय झाला, याबद्दल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सध्यातरी वेट अँड वॉच या भूमिकेत असून अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
सद्यस्थितीला शिंदे गटाकडे जवळपास 40 आमदार असून ठाकरेंसोबत असणारे आमदार शिंदे गटात सामिल होत आहे. दादा भुसे, उदय सामंत असे बडे नेतेही शिंदे गटात गेल्यानंतर आता कधीही मविआ सरकार पडून नवं सरकार स्थापन होईल अशीही चर्चा आहे. यामध्ये भाजप या सर्वाचा फायदा घेऊन नवं सरकार स्थापन कऱण्याचीही दाट शक्यता आहे. याबाबतच बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सध्यातरी असा कोणताही निर्णय़ भाजपने कोअर कमिटी बैठकीत घेतलेला नाही. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले असून गरज पडल्यास पुन्हा कोअर टीमची बैठक घेऊन आम्ही निर्णय़ घेऊ, असंही ते म्हणाले.
भाजप सध्या 'वेट अँड वॉच' या भूमिकेत
मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना भाजपने सध्यातरी कोणताही निर्णय़ घेतला नसून आम्ही 'वेट अँड वॉच' या भूमिकेत आहे. राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन आपली भूमिका भाजप ठरवेल. अविविश्वास ठरावाची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली असून जसजसे प्रस्ताव येथील त्यानंतर पुन्हा कोअर कमिटीची बैठक घेऊ, असंही ते म्हणाले.
भाजप आमदारांना मतदार संघातच राहण्याच्या सूचना
भाजपच्या सर्व आमदारांना मतदारसंघातच रहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणीही राज्याबाहेर आणि देशाबाहेर जाऊ नका असंही त्यांना सांगितला गेलं आहे. राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
हे देखील वाचा -
- Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना दिलासा, झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील Top 10 मुद्दे
- Maharashtra Political Crisis: घाण निघून गेली, ही पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
- Chandrakant khaire: एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांवर जादूटोणा केलाय; खैरेंचा अजब दावा