ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आज 'नो चलान डे'; ट्रॅफिक पोलिसांकडून जनजागृती
No Challan Day : 'नो चलान डे' उपक्रमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
No Challan Day : केंद्र सरकारने (Central government) काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही शेमध्ये असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहचला आहे. त्याजोडीला न्यायालयीन शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज 'नो चलान डे' उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली. तसेच आज कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतुक पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. तसेच 'नो चलान डे' हा केवळ आजच्या दिवसापूरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.
वाहतुकीच्या नविन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण, डोंबिवलीत देखील ट्रॅफिक पोलिसांतर्फे 'नो चलान डे' उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले.
आज दिवसभर कोणत्याही वाहनचालकास चलान लावून दंड आकारण्यात येणार नाही. उलट ज्यांनी वाहतुकीचे नियम मोडले आहेत, त्यांना समज देण्यात येणार आहे. वाहन चालकांनी नवीन मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे पालन करावे आणि नवीन कायद्यानुसार वाढलेल्या दंडाची रक्कम त्यांना लक्षात आणून देण्यासाठी आज 'नो चलान डे' पाळण्यात येत आहे. 12 डिसेंबर पासून राज्यात नवीन मोटार वाहन नियमानुसार दंडाची रक्कम आकारली जात आहे. ही रक्कम आधीच्या रकमेपेक्षा प्रचंड जास्त असल्यामुळे अनेक वाहनचालक आणि वाहतूक पोलिसां मध्ये खटके उडताना दिसत होते. असे खटके उडू नये आणि चालकांनी वाहतूक नियमांचे जास्तीत जास्त पालन करावे यासाठी 'नो चलान डे' ही संकल्पना केवळ ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आज राबविण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातमी:
ओमायक्रॉनचं संकट तीनपटीनं वाढतंय, जुनी जम्बो कोव्हिड सेंटर कार्यरत करणार; महापौरांची माहिती
Welcome to India! Intel भारतात करणार सेमीकंडक्टर निर्मिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha