एक्स्प्लोर

Nitin Gadkari Birthday : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवसानिमित्त खास संकल्प! संजय राऊतांकडून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी मोठा संकल्प केला आहे.

Nitin Gadkari Birthday : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा आज आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची गर्दी झाली आहे. निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली आहे. या निमित्ताने नागपूर शहरातही भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी मोठा संकल्प केला आहे. 75000 अमृत सरोवर करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

त्यांनी म्हटलं आहे की,  माझे सगळे मित्र आणि अभिष्टचिंतक यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. देशासाठी सेवा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे, विदर्भात शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी सतत प्रयत्नरत राहील, असं गडकरी म्हणाले.  

गडकरी म्हणाले की, भारताला स्वातंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल उद्या अमृत सरोवर कार्यक्रमा अंतर्गत पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरात उद्या 20 अमृत सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  एनएचआय मार्फत यंदा यांच्यातर्फे 75000 अमृत सरोवर करण्याच्या प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणाले. 

संजय राऊतांकडून गडकरींचं भरभरुन कौतुक 

गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी त्यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की,  मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जातोय त्यापैकी 90 टक्के काम गडकरींनी केली आहेत. रस्ते असतील, उड्डाणपूल असतील. अगदी देशाच्या सीमेपर्यंत काम केलंय. उत्तम रस्ते तयार झालेत, उड्डाणपूल तयार झालेत, दळणवळणाची साधने तयार झालीयत, याचं श्रेय नितीन गडकरींनाच द्यावं लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.  साधा माणूस आहे पण विकासाचा दृष्टीकोन आहे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा राष्ट्रीय शरद पवार यांच्यानंतरचा जर कोणी नेता असेल तर नितीन गडकरी आहेत,असंही राऊत यांनी म्हटलंय. गडकरी महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान काय हे नितीन गडकरींनी मागील सात वर्षात केलेल्या कामातून स्पष्ट दिसेल,असंही राऊत यांनी म्हटलं आहे.  मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड, निरोगी दिर्घायुष्य चिंतितो, अशा शब्दात राऊतांनी गडकरींना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget