एक्स्प्लोर
नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर मासे फेकले
सिंधुदुर्ग: मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी, सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले.
आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथं भेट दिली. यावेळी राणे यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली.
यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले.
तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथं यावं लागतं, असं म्हणत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.
VIDEO:
https://twitter.com/abpmajhatv/status/882883458489499648
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement