नितेश राणेंचा सोलापूर दौरा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताफ्याला दाखवले कोंबड्याचे चित्र
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मड्डी वस्ती येथे साकारण्यात आलेल्या 51 फुटी हनुमान मूर्तीचे पूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

Solapur : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मड्डी वस्ती येथे साकारण्यात आलेल्या 51 फुटी हनुमान मूर्तीचे पूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, सोलापुरात मंत्री नितेश राणे दाखल झाल्यावर त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्याचे चित्र दाखवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर विमानतळाबाहेर नितेश राणे यांचा ताफा येत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्याचे चित्र दाखवले.
कागदावर कोंबड्याचे चित्र काढून मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. नितेश राणे आज हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सोलापुरात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संतोष घोडके आणि शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्याचे चित्र दाखवले. नितेश राणे यांचा ताफा विमानतळाबाहेर पडत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.
महत्वाच्या बातम्या:
Anil Parab Vs Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले, कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो, अनिल परबांचं जशास तसं उत्तर, म्हणाले, खुनी लोकांनी शिकवू नये!
























