एक्स्प्लोर
शिवप्रेमी सहन करतात, म्हणून बदनामी सुरू आहे : नितेश राणे
दोन्ही छत्रपती ज्या पक्षात आहे त्या पक्षात आम्ही आहोत. दोन्ही राजे तुम्ही काहीच बोलू नका, जे काही करायचं ते आम्ही निष्ठेने करणार आहोत.
मुंबई : राज्यातील काही संघटना शिवप्रेमींना बदनामी करत आहेत. राज्यात जे चालू आहे ते देशातील इतर राज्यात कुठं दिसतं का? वंशजांची बदनामी सुरु आहे. राजस्थानमध्ये विचारलं जात का? माञ आपल्या राज्यात हे विचारल जात आहे. ज्यांनी देशाला प्रेरणा दिली आहे त्यां राजघराण्यावर टीका केली जाते. शिवप्रेमी सहन करतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वढूमध्ये नितेश राणे उपस्थित होते. त्यावेळी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, आपण गप्प बसतो. त्यामुळं आपण शिवप्रेमी आहे का, पुरावा मागतात. शिवाजी महाराजांचं देशात जगात नाव आहे. टाळ्या वाजवत आहात माञ टाळी ऐवजी हे हात संजय राऊत गालावर पडले तर बरे होईल. शिवाजी महाराजांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही.
'नितेश राणे तुमच्या पाठीमागं आहे, कोणाला सोडवायचा त्यांना सोडवू, रक्त खवळले पाहिजे. तीनपट लोक नाव ठेवतात माञ आपण दोन चार पुतळे जाळत आहे. शिवसेना शिवाजी महाराजांची दोनदा जयंती साजरी करत आहे. जेम्स लेनला यांनी हिरो केला. यंदा तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार का? कोण जातंय बघतो. यंदा एकाच 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असं आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले. तिथीनुसार जयंती साजरी करण्याबद्दल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टोला दिला. तिथीनुसार उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची दोनदा जयंती साजरी करा, असे नितेश राणे यांनी सांगितले.
नितेश राणे म्हणाले, माझ्यावर टीका होते मात्र समोर येऊन बोलत नाही. ट्विटर वर बोलतात. दोन्ही छत्रपती ज्या पक्षात आहे त्या पक्षात आम्ही आहोत. दोन्ही राजे तुम्ही काहीच बोलू नका, जे काही करायचं ते आम्ही निष्ठेने करणार आहोत. फक्त सातारा निदर्शनं मात्र कुठं काहीच होत नाही, एवढंच आपले महाराजांवरील प्रेम का, जितेंद्र आव्हाड ज्ञान देतात, आव्हाड समोर येऊदे मग बघतो. लोक आपल्यावर थुंकत आहे. वंशज नावं ठेवत आहे. पूर्वी जसे राज्यात लाखाचे मोर्चे काढले त्यानुसार पुन्हा एकदा एक 54 वा मोर्चा काढावा. पुन्हा एकदा मराठा स्वाभिमान मोर्चा काढण्याचे आवाहन केले.
संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे तुलना संभाजी महाराज बरोबर केली आहे. पोलिसांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. ते आता पत्रकार परिषद घरी घेत आहे. आम्हला 48 तास फार झाले, पोलिसांच्या गराड्यात धमकी देतात, पत्रकार परिषदेऐवजी येथे तुळापुरला येऊन बोलून दाखवा, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement