Niranjan Davkhare : कोकण पदवीधरमध्ये भाजपचा झेंडा, निरंजन डावखरेंची विजयाची हॅट्रिक
Konkan Graduation Constituency Election : कोकण पदवीधरमध्ये सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचा मान भाजपच्या निरंजन डावखरे यांच्या नावावर नोंद झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan Graduation Constituency Election) भाजपच्या निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांनी काँग्रेसच्या रमेश किर यांचा 1 लाख 719 मतांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विजय मिळवला आहे. कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपण त्यांचा आभार मानतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कोकण पदवीधरमध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे.
महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आले. हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे.
कोकणातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी माझ्यावर सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे. आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न करेल.
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) July 1, 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ घडविण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये… pic.twitter.com/UDNUFYaJf6
कोकणमध्ये 100 टक्के महायुती
राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण हे डावखरेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निरंजन डावखरे यांनी हॅट्रीक केली आणि प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे कोकण आता 100 टक्के महायुतीचं झालं आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. डावखरेंचा विजय ही कामाची पोचपावती आहे. मुंबई आणि मुंबई संदर्भात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलण योग्य नाही. मात्र लवकरच विधानसभा आहे, त्यावेळी समजेल.
मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. त्यामध्ये अनिल परब यांनी बाजी मारली. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना होता. कोकण पदवीधरची जागा निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा जिकली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला.
ही बातमी वाचा: