कणकवलीमध्ये भाजपनं 169 मतदार वाढवले, शिवसेना आमदार निलेश राणेंचा भाजपावर मोठा आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण गरम झालं आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे.
Nilesh Rane on BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक भागात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण गरम झालं आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. कणकवली मधील एका मतदारसंघात 169 मतदार वाढवल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
भाजपाचे कणकवली नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांच्या राहत्या घरात घर क्र- 389 मध्ये शेख साजिदा दाऊद, मुल्ला रेहबत तैबा यासिन, शेख दाऊद कादर हे तीन मुस्लिम राहत असल्याची नोंद आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 21, 2025
शिवाय या निवडणुकीदरम्यान एवढे त्यांच्या प्रभागात सुमारे 169 मतदार वाढले आहेत. याबाबत मी आज… pic.twitter.com/wYetMd7Kds
आमदार निलेश राणे यांनी भाजपावर मोठा आरोप
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीवरुन महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. आमदार निलेश राणे यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. कणकवली मधील एका मतदारसंघात 169 मतदार वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांनी आपल्या राहत्या घरात घर क्र- 389 मध्ये शेख साजिदा दाऊद, मुल्ला रेहबत तैबा यासिन, शेख दाऊद कादर हे तीन मुस्लिम राहत असल्याची नोंद केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. शिवाय त्यांच्या प्रभागात सुमारे 169 मतदार वाढले याबाबत कणकवली नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन सर्व पुरावे सादर केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
कणकवलीमध्ये नगरपरिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांमध्ये (Kankavali Nagarparishad Election 2025) राणे विरूद्ध राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागलीय. नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) दोघेही आमने सामने आहेत. कणकवलीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे. तर भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी अनोखी युती होत शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे आमनेसामने येत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
महत्वाच्या बातम्या:























