एक्स्प्लोर
Advertisement
...तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नसल्याची प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली.
कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली आहे. ते कुडाळमधील सभेत बोलत होते.
काँग्रेसने सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्तीनंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या नारायण राणेंनी कुडाळमध्ये सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याआधी त्यांनी गोवा ते कुडाळ असं शक्तिप्रदर्शन केलं. या कुडाळमधील सभेत माजी खासदार निलेश राणेंनीही कार्यकर्त्यांना संबोधलं.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नसल्याची प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी घेतली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. शिवाय, शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैर सर्वश्रुत आहे.
दरम्यान, निलेश राणेंच्या या ‘दाढी प्रतिज्ञे’वर खासदार विनायक राऊत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे विनायक राऊत किंवा शिवसेनेकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement