एक्स्प्लोर

NIA Raids Live Updates : देशात NIAचं 'ऑपरेशन PFI'! राज्यात मुंबई, ठाण्यासह मराठवाडा, विदर्भात छापेमारी, अनेक संशयित ताब्यात

NIA Raids Live Updates : महाराष्ट्रासह 8 राज्यांत एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूरसह 50 ते 55 ठिकाणी छापासत्र सुरु आहे.

LIVE

Key Events
NIA Raids Live Updates : देशात NIAचं 'ऑपरेशन PFI'! राज्यात मुंबई, ठाण्यासह मराठवाडा, विदर्भात छापेमारी, अनेक संशयित ताब्यात

Background

NIA Raids Live Updates : दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Maharashtra ATS)  मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि सोलापूरमधून (Solapur) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यलयांवर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली. 

औरंगाबादमध्ये कारवाई

औरंगाबाद एटीएस आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि एटीएसकडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती.

सोलापूरमधून एकजण ताब्यात 

सोलापूरमध्येही PFI विरोधात NIA ने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.  सोलापूरमधून NIA ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.  ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला NIA च्या पथकाने आपल्या सोबत चौकशीसाठी दिल्लीला नेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशभरात पुन्हा छापेमारी 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी केली. प्राथमिक वृत्तानुसार, तपास यंत्रणांनी आसाममधून 7 जणांना आणि कर्नाटकमधून 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. 

आसाममध्ये आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरू केली. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली. 

देशविरोधी कारवायांचा आरोप 

पीएफआय ही संघटना देशविरोधी कारवायात असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आहे. 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा कट आखला असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.

13:39 PM (IST)  •  27 Sep 2022

Buldana News : पीएफआय चे पदाधिकारी ईखलास खान समीर खान याला एटीएस पोलिसांनी घेतले ताब्यात.

Buldana News : बुलढाण्यातील पीएफआयचा पदाधिकारी ईखलास खान समीर खान वय 27 वर्ष रा जोहर नगर याला बुलढाण्यातुन आज सकाळी  एटीएस ने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान  बुलढाणा येथे पीएफआयचे जिल्हाध्यक्ष हाफीस रईस यांच्या नेतृत्वाखाली संतप्त 10 पीएफआय चे पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्या समोर रास्ता अडवून निदर्शने केले. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी तात्काळ पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पी इफ आय चा ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे दोन भाऊ हे पोलिसांत असून एक औरंगाबाद पोलीसात तर दुसरा बुलढाणा पोलिसांत आहे.

12:14 PM (IST)  •  27 Sep 2022

NIA-ATS Raids: जालन्यातून पीएफआयचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात

Jalna:  पहाटे चंदनजीरा पोलिसांनी कन्हैयानगर भागातून पीएफआयच्या माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी सुद्धा जालना येथील एकाला NIA-ATS ने ताब्यात घेतले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कन्हैयानगर भागातून पोलिसांनी पहाटे ही कारवाई केली आहे. ज्यात PFI चा माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या मोहम्मद सलमान खान ( वय 25 वर्षे) याला ताब्यात घेतलय.

11:52 AM (IST)  •  27 Sep 2022

Nanded : नांदेडमधून पीएफआयचा सदस्य आबेद अली NIA च्या ताब्यात

नांदेड येथून आज आबेद अली मोहंमद अली खान याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. ऑटोमोबाईल्सचे दुकान असलेल्या आबेदचं बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्या घरात आई,तीन भाऊ, पत्नी-मुलं तो स्वतः आहे. तर तीन भावापैकी दोन नंबरचा तो आहे. गेल्या सात वर्षांपासून तो PIF चा पूर्णवेळ सदस्य आहे. विविध ठिकाणी आंदोलन करून प्रक्षोभक भाषणे अनेक वेळा याच्याकडून करण्यात आले असून, तो नांदेड येथील PIF चा प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज NIA आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत याला ताब्यात घेतलंय. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील तो रहिवाशी आहे.

10:22 AM (IST)  •  27 Sep 2022

Beed NIA and ATS Raids On PFI : बीडमधून एका पीएफआयच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतली ताब्यात

Beed NIA and ATS Raids On PFI : बीडमधून एका पीएफआयच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतली ताब्यात

यापूर्वी एक जण एटीएस च्या ताब्यात आहे आज सकाळी बीड शहर पोलीसानी एका संशयिताला  ताब्यात घेतले आहे. 

10:14 AM (IST)  •  27 Sep 2022

Pune NIA and ATS Raids On PFI : कोंढवा परिसरातून 6 जण चौकशीसाठी ताब्यात

Pune NIA and ATS Raids On PFI : पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. घोषणाबाजी आणि एनआयएच्या (NIA) कारवाईच्या पार्शवभूमीवर घेतलं ताब्यात चौकशी सुरू आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget