एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लग्नानंतर अवघ्या बारा दिवसात नवविवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
घरातील कूलरची साफसफाई करताना विजेचा धक्का बसल्यामुळे बीडमध्ये 19 वर्षीय कोमल संजय शेलारचा जागीच मृत्यू झाला.
बीड : लग्नानंतर तळहातावरची मेहंदी सुकत नाही, तोच नवविवाहितेचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये समोर आली आहे. कूलरमधून विजेचा धक्का बसल्यामुळे 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला.
सध्या राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. एकीकडे दुष्काळ तीव्र होतानाच थंड हवेसाठी लागणाऱ्या उपकरणांचा वापरही वाढला आहे.
घरातील कूलरची साफसफाई करताना विजेचा धक्का बसल्यामुळे कोमल संजय शेलारचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील मादळमोही गावात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे कोमल साफसफाई करत होती. कूलरची ओल्या कापडाने पुसताना कोमलला विजेचा शॉक लागला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ही बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कोमलला उत्तरीय तपासणीसाठी मादळमोहीच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं होतं.
कोमलचा विवाह जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी गावी बीडमधील मादळमोहीतल्या संजय शेलार याच्याशी अगदी साध्या पद्धतीने झाला होता.
लग्नाला पंधरवाडाही उलटला नसताना तिच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement