(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neelam Gorhe : पुण्यातील 'त्या' घटनेबाबत शिक्षणमंत्री आणि उच्च-तंत्र शिक्षणमंत्र्यांशी बोलणार - नीलम गोऱ्हे
Neelam Gorhe On Pune Incident : शाळासारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीची दंडेलशाही करणं शाळा व्यवस्थापनाला शोभणारे नाही.
Neelam Gorhe On Pune Incident : पुण्यात (Pune) महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत घडलेल्या घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळासारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीची दंडेलशाही करणं शाळा व्यवस्थापनाला शोभणारे नाही. मी एबीपी माझावर पुण्यातील घटनेचे शॉट्स पाहिले आहे. असे वाद पालक-शिक्षक असोसिएशनच्या नियमित बैठकांमध्ये सोडवता येऊ शकतात. मात्र पालकांनी ही एक एकटे वाद घालणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली आहे.
'अशा' शाळांमध्ये पालकांची दिशाभूल केली जाते- गोऱ्हे
पुण्यामध्ये काही शाळा अशा आहेत की त्यांची नोंदणीच नाहीये. त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पालकांची तिथे दिशाभूल केली जाते, त्यामुळे शिक्षण संचालकांना अशा शाळांचे प्रश्न लवकर सोडविण्याचे निर्देश दिल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. पुण्यातील घटनेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दोघांशी बोलणार असून अशा शाळांच्या प्रश्नांबद्दल काय तोडगा काढता येऊ शकते यावर शिक्षण विभागाने पुढील दोन-तीन दिवसात बैठक घ्यावी असे माझे प्रयत्न राहणार असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
अनेक ठिकाणी फी वसुलीसाठी पालकांवर दबाव
दरम्यान, पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा धरू नये, कारण शाळांनीही तग धरले पाहिजे, याची जाणीव पालकांनी ठेवावी. मात्र कुठल्याही मुलांची शाळा फी अभावी बंद होऊ नये याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. कोरोना काळात काही संचालकांनी सेवाभावातून शाळा चालवली, तर काहींनी ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही क्रीडांगणाची फी वसूल केली आहे. अनेक ठिकाणी फी वसुलीसाठी पालकांवर दबावही टाकला गेलाय. त्यामुळे काही ठिकाणी पालकांची प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. न्यायालयानेही आधीच सांगितले आहे की पूर्ण मोफत शिक्षण देऊ नका. मात्र काहीतरी सवलत द्या असं शाळांना न्यायालयाने सांगितले असल्याची आठवण नीलम गोऱ्हे यांनी करून दिली.
संबंधित बातम्या
महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकाला मारहाण, 'फी'बाबत चर्चेसाठी शाळेत आल्यानंतरचा प्रकार
Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण
Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर