एक्स्प्लोर
सोयाबीन खरेदीच्या जाचक अटींविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादीचं आंदोलन
सोयाबीन खरेदीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्यात आंदोलन केल. तर कृषीपंपाना वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी काँग्रेसनं शिर्डीत रास्तारोको केला.

सातारा/ शिर्डी : सोयाबीन खरेदीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्यात आंदोलन केल. तर कृषीपंपाना वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी काँग्रेसनं शिर्डीत रास्तारोको केला.
गेल्या काही दिवसांपासून सोयबीन विक्री करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतरेंच्या गाडीसमोर सोयाबीन फेकून हे आंदोलन करण्यात आलं.
सरकारकडून सोयाबीन खऱेदी केलं जात नाही, असा आरोपही आंदोलकांनी केला.
दुसरीकडे कृषीपंपांना वीजपुरवठा करावा या मागणीसाठी काँग्रेसनं शिर्डीत रास्ता रोको केला. संगमनेर तालुक्यात हे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी कोल्हार ते घोटी मार्ग काँग्रेस कार्यकर्त्यानी काही काळ रोखून धरला. सरकारनं कृषी पंपांना तातडीनं वीज पुरवठा करावा अशी यावेळी आंदोलकांनी मागणी केली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















