Supriya Sule : मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला, पक्षाचे चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उध्वस्त केलं, मात्र...सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
Supriya Sule : राज्यात अदृश्य शक्ती चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर तोफ डागली आहे.
Supriya Sule एक वर्षांपूर्वी पक्ष कुठे होता, चिन्हं कुठे होतं? आमदार, खासदार कुठे होते आणि आज आम्ही कुठे आहोत. या साऱ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानते. ज्यांची सत्तेची पद होती त्यातील काही लोकांनी आमचा पक्ष आणि चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उध्वस्त केलं. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला. मात्र, सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, ती मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. मात्र, या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती इथे काहीही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर तोफ डागली आहे.
जयंत पाटील जे बोलले तेच नितीन गडकरी, राज ठाकरे बोलले
यावेळी बोलताना राज्याच्या अर्थ खात्यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. अर्थ खात्याच्याबाबत डेटा फार महत्वाचा आहे. जो महारष्ट्र सरकारकडून येतो. तुम्ही किती लोन घेऊ शकतात, केंद्र किंवा राज्यला काही लिमिट आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ही मर्यादा घातली होती. एफआरबीएम कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज भाष्य केलं होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे ही तेच म्हणतं आहे. त्यामुळे यात अभ्यासाची तसेच डेटा सगळं सांगतोय त्यानुसार चौकशी गरजेची आहे. निर्णय रेटला आहे. लोकशाहीमध्ये सगळयांना बोलयाचा अधिकार आहे. मात्र ऑब्जेक्शन असताना त्याकडे दुर्लक्ष करता असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या
आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, आम्ही संविधानवाले आहोत- सुप्रिया सुळे
अतिथी देवो भव: ही आपली संस्कृति आहे. त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे. आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत. संविधान केंद्रबिंदु ठेवून आम्ही राजकारण करतो. सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या, अस त्यांनी म्हटले आहे. भाजप जुना पक्ष आहे. तरीही आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही. चांदीच्या ताटात जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भाजपचे कार्यकर्ते जेवायला बसत नाहीत, तर बाहेरून आलेले बसतात. मात्र, काही केलं तर महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे. त्यांना फार यश मिळेल असं वाटत नसल्याचे म्हणत गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे.
हे ही वाचा