एक्स्प्लोर

मोठी बातमी! मारकडवाडीत वात पेटली, धग मात्र दिल्लीत, उत्तमराव जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, जंतर मंतरवर करणार आंदोलन

Uttamrao Jankar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत.

Uttamrao Jankar : ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी. ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केली आहे. 

आमदार उत्तमराव जानकर व माजी आमदार बच्चू कडू दिल्लीत आंदोलनाला बसणार

23 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक आयोगाला मारकडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर केली जाणार आहेत. याच दिवशी जर मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर न केल्यास आमदार उत्तमराव जानकर व माजी आमदार बच्चू कडू दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनास बसणार आहेत.

माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावी काल हात वर करून झाले मतदान

माळशिरसमधील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा आता दिल्लीतील जंतर मंतरवर गाजणार आहे. आमदार उत्तम जानकर यांनी पदाचा राजीनामा देऊन माळशिरसमध्ये पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी आणि धानोरे गावातील मतदारांनी ग्रामसभा घेऊन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत. या दोन्ही गावातील मतदारांचे प्रतिज्ञापत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर केले जाणार आहेत. त्यात त्यांनी पुन्हा मॉक पोलसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. नुकतेच धानोरेमधील मतदारांनी हात वर करून मतदान केले आहे. त्यात 1206 मतदारांनी हात वर केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष 963 मते मिळाली होती.

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य झाली नाही तर...

जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर आमदार उत्तम जानकर हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त यांना देणार आहेत. जर मागणी मान्य नाही झाली तर 23 जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार जानकर यांनी दिला आहे.

माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना झाला होता. यामध्ये जानकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते मिळाल्याचे समोर आले. यावर जानकर गटाने आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडले, त्यानंतर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी, अशा मागणी केली जाऊ लागली. मात्र, प्रशासनाच्या विरोधानंतर या गावात बॅलेट पेपरवर मतदान झाले नाही. मात्र, उत्तमराव जानकर यांनी वारंवार बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Uttamrao Jankar : राज्यात संशयाचं वातावरण, उत्तमराव जानकर शरद पवारांना भेटले, EVM प्रकरणात पुढची दिशा काय? म्हणाले..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget