एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच
एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या, मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होमग्राऊण्डवरच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे.
नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री ढोमणे सरपंच झाल्या आहेत.
राज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा आज निकाल
एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळालं. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे. काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. यातील साधारण 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement