'Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 08 Feb 2024 02:13 PM
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला-सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपोटी महाराष्ट्र नासवलाय असा घणाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परभणीत केलाय.अंधारेंची मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रा आज परभणीत दाखल झाली यावेळी शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या महिला संवादात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय.महायुतीच्या नेत्यांची महिलांविषयी भूमिका अत्यंत खालच्या  पातळीवर सुरू आहेत ते पाहता यांना रामच कळाला नाही जे नेते ७२ तास शब्द पाळू शकत नाहीत ते रामाचे काय होणार ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारलाय.एक वचनी एक पत्नी आणि एक विचार असलेला रामाचा खरा पाईक म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचे हि सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना फोन करा आणि सगेसोयरे बाबत आवाज उठवायला सांगा.. 15 तारखेला अधिवेशनात जो आमदार बोलणार नाही त्या आमदाराला दारातही उभं करू नका- मनोज जरांगे पाटील यांचे नाशिकच्या दिंडोरी शहरातील जाहीर सभेत वक्तव्य

राज्यसभेच्या काँग्रेसला दहा जागा मिळणार

काँग्रेसला राज्यसभेच्या दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी अथवा प्रियंका गांधी, पवन खेडा यांना राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.


 


 

Pune News : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री आळंदीत; संत माऊली, तुकोबांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

पुणे : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री पुण्यातील देवाच्या आळंदीत आलेत. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवला. भाविकांची ही मोठी गर्दी होती, पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त लावला होता. दर्शन घेऊन बाहेर पडताच धिरेंद्र शास्त्रींनी संत माऊली, तुकोबांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर धिरेंद्र शास्त्री अडचणीत आले होते. पण मी ही संत परंपरा जपणारा माणूस आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते अशा रीतीने करताना दिसतायेत.

राजन साळवी आणि कुुुटुंबियांना तूर्तास दिलासा नाही

राजन साळवी आणि कुुुटुंबियांना तूर्तास दिलासा नाही


एसीबीनं दाखल केलेल्या गुन्हा प्रकरणी राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाची अटकपूर्व जामीनीसाठी हायकोर्टात याचिका


सरकाली वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली

भूजबळांना लाज नाही, त्यांनी नाभिक समाजाची माफी मागायला हवी. ते स्वार्थी राजकारणी आहेत - मनोज जरांगे

भूजबळांना लाज नाही, त्यांनी नाभिक समाजाची माफी मागायला हवी. ते स्वार्थी राजकारणी आहेत - मनोज जरांगे


भुजबळ यांना अजून एक संधी आहे. माणसंच मोजायची आहे ना तर ज्या दिवशी अंमलबजावणी सुरू होईल, त्या दिवशी आमची महादिवाळी होईल आणि त्या दिवशी एखाद्या पुलावर आरटीओ म्हणून या, अशी खोचक टिप्पणी जरांगेंनी केली.

Parbhani News : एसटी महामंडळाकडूनच प्रवाश्यांचा जीव धोक्यात 

Maharashtra News LIVE Updates : परभणी : मागच्या काही दिवसांत एसटी महामंडळाकडून एसटी बसेस कडे मोठे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळेच अनेक बसेस  नादुरुस्त आहेत आणि त्याच अवस्थेत बसेसचा वापर ही केला जात असल्याने प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.. परभणीत तर चक्क एका बाजूने मोठ्या प्रमाणावर झुकलेली बस वापरण्यात येत आहे.वसमत ला जाणारी बस ही एका बाजूने वाकलेली पाहायला मिळाली त्यात अनेक प्रवासी बसलेले होते..रस्त्याने जाणारा येणारा प्रत्येक जण या बसकडे पाहत होता आम्ही या बसचा पाठलाग करत बस चालकाला अशी बस का वापरत आहात हे विचारल्या नंतर त्यांनी थेट त्यांच्या दुःखावर बोट ठेवत अनेक वेळा वरिष्ठांना सांगून ही या बसची एका बाजूची स्प्रिंग दुरुस्त केली जात नसल्याने अशीच बस चालवावी लागत असल्याचे सांगितले त्यामुळे एसटी महामंडळच अशा प्रकारच्या बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे काय असा प्रश्न निर्माण झालाय..

बाप बदलण्याची नवीन पद्धत आता राजकारणात आली - रोहिणी खडसे

Maharashtra News LIVE Updates :  जन्मदात्या बापाचं नाव लावणे अपेक्षित असते, मात्र बाप बदलण्याची नवीन पद्धत आता राजकारणात आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अजित दादा गटावर केली आहे. 


ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला त्या पक्षाचे चिन्ह काढण्यात आलं, त्यामुळे आपल्या पक्षाचंही चिन्ह काढण्यात येईल हे माहित होतं. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात आणि भारतात शिल्लक राहिलेली नाही, असा टोलाही यावेळी रोहिणी खडसे यांनी लगावला. 

Maharashtra News LIVE Updates : ठाण्यात शॉक लागुन डॉमिनोझ पिझ्झाचा कर्मचारी ठार

Maharashtra News LIVE Updates : ठाण्याच्या गांधीनगर, नळपाडा येथील आणि वर्तकनगर हद्दीत असलेल्या डोमिनोज पिझ्झा मध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुण महेश अनंत कदम याचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर अपघाती मृत्यूचे चित्रण सीसी टीव्हीत कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.मृतक महेश अनंत कदम हा साईसेवा सोसायटी, शिवाजी नगर, राबोडी, ठाणे येथे वयोवृद्ध आईसह राहत होता. मृतक महेश हा घरातील एकटा कमविता होता. तो वर्तकनगर मधील पिझ्झा दुकानामध्ये मंगळवारी रात्रपाळीला कामावर गेलेला महेश ओव्हरटाईम करीत होता. आज पहाटे घरी जाण्यापूर्वी त्याला पिझ्झा शॉप सफाईचे काम देण्यात आले होते. पहाटे प्रेशर पाण्याने सफाई करताना विद्युत केबलचा शॉक लागून महेशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Maharashtra News LIVE Updates : पालघर - इमारती अभावी शिक्षणाचे धडे झाडाखाली

Maharashtra News LIVE Updates :  शाळेला वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर शिक्षण घ्यावं लागत असल्याचां धक्कादायक प्रकार पालघर मधील डहाणू तालुक्यात समोर आला आहे . यामुळे पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे . डहाणू तालुक्यातील आंबेमोरा येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या प्राथमिक शाळेत 49 विद्यार्थी शिक्षण घेतात.  मागील वर्षी एप्रिल महिन्यात या शाळेतील एक वर्ग खोली धोकादायक असल्याने तोडून जमीनदोस्त करण्यात आली .  तर दुसऱ्या वर्ग खोलीच्या दुरुस्तीच काम मागील महिनाभरापासून हाती घेण्यात आल आहे .  मात्र मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच नसल्याने हे चिमुकले विद्यार्थी मागील महिनाभरापासून जंगला शेजारी एका झाडाखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत . त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे  . आंबेमोरा हे गाव जंगला शेजारी असल्याने येथे कुत्र्यांसह सापांचीही मोठी भीती आहे . मात्र असं असताना देखील हे विद्यार्थी झाडांखाली शिक्षण घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे  .  त्यामुळे उघड्यावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याच सांगत शासनाने या शाळेच्या इमारतीच काम लवकरात लवकर पूर्ण कराव अशी मागणी पालकांकडून केली जात आहे .

RBI कडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे

RBI : RBI कडून पतधोरण जाहीर झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5 टक्क्यांच्या वर राहणार आहे. आरबीआयकडून सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम आहेत.  

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंकजा मुंडेंसह विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर लवकरच अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारणी घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात काही लोकसभा मतदारसंघात निवडून येणार संयुक्त उमेदवार दिला जाणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. जो नवीन सर्व्हे आला तो लोकांचा मोदी गॅरंटीवर विश्वास असल्याचे सांगणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले. मनसेच्या युतीबद्दल अजून तरी माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

वर्धा - हमीभावा पेक्षाही कमी भावात कापूस खरेदी 
Maharashtra News LIVE Updates :   शासनाने कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही खरेदी ही हमीभावापेक्षाही कमी दरात केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला गेलाय. त्यामुळे देवळी येथील कृषी उत्पन्न समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात  शाब्दिक वाद उफाळला होता. काही काळ लिलाव बंद राहिले, व्यापाऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याने अवाक जास्त झाल्याचे कारण सांगून दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. मात्र व्यापाऱ्यांचा हमीभावत खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करणे या शासनाच्या भूमिकेला विरोध आहे. देवळी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अवाक जास्त झाल्याने माल ठेवायला जागा नसल्याचे कारण समोर करण्यात येऊन बाजार समिती दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे. हेच चित्र जिल्ह्यात देखील आहे. पण नेमके बाजार बंद ठेवण्याचे करण काय? याचा शोध घेतला असता शासनाने व्यापाऱ्यांना दिलेला इशारा हेच नेमके यामागचे कारण असल्याची बाब समोर आली आहे.  
वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात

वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणार स्टेटस त्यांनी अपलोड केलं आहे. "आता सगळेच म्हणू लागलेत  पुणे की पसंत मोरे वसंत", असं त्यांनी  स्टेटस ठेवलं आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली आहे. 

rbi repo rate : आरबीआयकडून सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे 

rbi repo rate : आरबीआयकडून सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आरबीआयकडून रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सर्वसामान्यांना व्याजदरात कोणताही दिलासा नाही. आरबीआयकडून पतधोरण जाहीर करण्यात आलेय. 

Praniti Shinde : अजमेर जाकर मेरे लिये दुआ करो, प्रणिती शिंदेंची मुस्लिम बांधवांना भावनिक साद

Maharashtra News LIVE Updates : सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना झाले. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी स्वखर्चातून दोनशे भाविकांसाठी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गाला जाण्याची व्यवस्था केली आहे. या भाविकांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे ह्या उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदेनी मुस्लिम बांधवाना भावनिक साद ही घातली. "अजमेर मे जो मांगे वो दुवा कबूल होती है. अजमेर जाकर ख्वाजा गरीब नवाज इनके सामने मेरे लिये दुआ करो और पार्टी के लिये दुआ करो" अशी भावनिक साद घातली. हे केवळ माझ्यासाठी नाहीये. अल्पसंख्याक, दलित आणि गोरगरीब यांच्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक आणि तेलंगनामध्ये मुस्लिम बांधवानी काँग्रेसला साथ दिली तशीचं साथ महाराष्ट्र आणि देशभरात द्यावी." असे आवाहन ही प्रणिती शिंदेनी केलं. 



आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे सोलापूर शहरातील केएमसी गार्डन या ठिकाणी स्थानिक नेते नजीब शेख यांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे कार्यक्रमाला आवर्जून हजर होत्या.

Sindhudurg : हुमरमळा येथे आज सकाळी अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : सिंधुदुर्ग : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ जवळील हुमरमळा येथे आज सकाळी अपघात घडला. महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने ठोकरले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव चारचाकी वर चालकाचे नियंत्रण राहिले नसल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कार ने पादचाऱ्याला ठोकर दिल्यानंतर पादचारी २० फूट लांब फेकला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Buldana : पोलीस कर्मचाऱ्याने 'सोशल मीडिया' वर टाकली जातीयवादी पोस्ट, पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित

Maharashtra News LIVE Updates : समाजमाध्यमावर कार्यकर्ते किंवा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्याला सेवेतून तात्काल निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गजानन खेर्डे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तो खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे.


त्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला. ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी खामगाव नियंत्रण कक्षाकडून अहवाल मागविला. पडताळणी नंतर खेर्डे याला निलंबित करण्यात आले. तसेच बुलढाणा शहर ठाणेदारांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आले.

uddhav thackeray : कोकणातल्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देणार

Maharashtra News LIVE Updates : कोकणातल्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी देणार आहेत. तर पुढील आठवड्यात मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच  रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.  या दौऱ्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर  उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईतील शाखांना भेटी देण्याचे नियोजन केलं आहे.


 यामध्ये शुक्रवारी  उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील  शाखांना भेटी देतील यामध्ये  अंधेरी पूर्व,अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा या विधानसभेतील शाखांना ठाकरे भेटी देणार आहेत. तर शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील धारावी, चेंबूर आणि अनुशक्ती नगर  विधानसभा क्षेत्रातील शाखांना भेटी देणार असल्याची माहिती आहे. या मुंबईतील शाखांच्या  भेटीनंतर उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात मराठवाडा दौरा करणार असल्याचं  सांगण्यात आलय.

Pune Crime : पुणे पोलिसांच्या आदेशाला "भाई लोकांच्या" कार्यकर्त्यांची केराची टोपली

Maharashtra News LIVE Updates :   गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच? सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अद्याप ही सुरू आहेत. गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंट वर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले आहे.

Pune Crime : शुल्लक कारणावरुन पिस्तूल काढले, पोलिसांची घटनास्थळावर धाव

Maharashtra News LIVE Updates :  पुण्यातील हडपसर परिसरात दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने चक्क पिस्तूल काढले. पिस्तूल काढत धमकावताना त्याने आपण रोहित पवारांचा अंगरक्षक असल्याचा दावा केलाय. या घटनेनंतर दोन गटात बाचाबाची झाली. बघ्यांची गर्दी ही घटनास्थळी मोठ्या संख्येने झाली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले..


हडपसर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याजळील पिस्तूल जप्त केले.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती खरंच रोहित पवारांचा अंगरक्षक आहे का याचा तपास आता हडपसर पोलीस करत आहे.

Nagpur Crime : सराईत वाहन चोराला अटक, 111 दुचाकी जप्त

Maharashtra News LIVE Updates :  नागपूर पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली असून त्याच्या जवळून दहा किंवा वीस नाही, तर तब्बल 111 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ललित भोगे नावाव्हा हा चोर अवघ्या 24 वर्षाचा असून तो फक्त नागपूरच नाही, तर नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या नऊ जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करायचा आणि त्यांना ग्रामीण भागामध्ये विकायच्या. गेले काही महिने नागपूर शहरात सातत्याने वाहन चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलीस सातत्याने सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत होते जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेक दिवस तपासल्यानंतर नागपुरातून बेपत्ता होणाऱ्या वाहनांच्या मागे एकच चोर असल्याची शंका बळवली पोलिसांनी गोपनी पद्धतीने त्याचा शोध सुरू केला.. तेव्हा ललित भोगे नावाचा हा चोर सध्या नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली.. तेव्हा त्याने अमरावती जिल्ह्यातील वरुड या मूळ गावात 20 दुचाकी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वात आधी त्या 20 दुचाकी जप्त केल्या आणि त्यानंतर या सराईत चोराच्या पुढील चौकशीत आणखी 91 दुचाकी जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले आहे.खास बाब म्हणजे 24 वर्षांचा हा सराईत चोर फक्त बारावी उत्तीर्ण आहे.. मात्र त्याला ऑटोमोबाईल क्षेत्राची खडा न खडा माहिती आहे आणि आपल्या त्याच ज्ञानाचे आधारावर तो डुप्लिकेट किल्ली चा वापर करून किंवा दुचाकीचा हँडल तोडून शिथाफीने दुचाकी चोरून पळवायचा. 

Pune News : पुणेकर वाहतूक कोंडीला त्रस्त, पुण्यात थेट सिग्नल यंत्रणेची पूजा

Maharashtra News LIVE Updates : पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टी,वारजे विभाग यांच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे व गेल्या पाच वर्षापासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचा पूजा करून निषेध करण्यात आला. 


या ठिकाणी रोज सकाळी ८ ते 11 व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. गेल्या पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या सिग्नल यंत्रणा जर चालू झाली तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल असे मत शहर उपाध्यक्ष  निलेश वांजळे यांनी मांडले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिग्नल यंत्रणेला हार फुलं वाहिली

Mumbai News : दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश

Maharashtra News LIVE Updates : दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश मिळाले आहे. शाळा आणि वाढीव क्षमतेसह दामोदर नाट्यगृह यांचे बांधकाम एकाच वेळी सुरू होणार आहे.  मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आज दामोदर नाट्यगृहाच्या तात्काळ पुनर्बांधणीच्या दृष्टीने सकाळी 10 वाजता महापालिका अधिकाऱ्यासोबत  नाट्यगृह परिसराची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दामोदर नाट्यगृह वाढीव बांधावे यासाठी आणि इतर मागण्यासह कलाकारांनी दामोदर नाट्यगृह बचाव आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याची दखल घेत यासंदर्भात बैठक घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना मोठं नाट्यगृह हे शाळेचे काम सुरू होईल त्यावेळेसच सुरू करावे. तसेच नवीन आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या - मराठा क्रांती ठोक मोर्चा

Maharashtra News LIVE Updates :  मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. राज्यपालांना 3 वाजता निवेदन देत मराठा क्रांती ठोक मोर्चा मागणी करणार आहे. 


मराठा व ओबीसी समाजात भुजबळ हे तेढ निर्माण करत आहेत अशी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे म्हणणं आहे. त्यामुळे संविधानिक पदावर राहण्याचा भुजबळ यांना अधिकार नाही, त्यांची हकालपट्टी करा अशी क्रांती ठोक मोर्चाची राज्यपाल व सरकारकडे मागणी केली.

Ashish Deshmukh vs Anil deshmukh : सध्या राजकारणात पुतण्यांचा जमाना, अनिल देशमुखांना टोला

Maharashtra News LIVE Updates :  सध्या राजकारणात पुतण्यांचा जमाना आहे. राष्ट्रवादीचे पक्ष चिन्ह पुतण्यालाच मिळाले. त्यामुळे काका अनिल देशमुख यांनी वडीलधारी भूमिकेत राहावे असा खोचक सल्ला भाजप नेते आशिष देशमुख यांनी आपले काका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला. मी 2019 मध्ये  काटोल विधानसभेतून लढलो असतो तर अनिल देशमुख यांची जमानत जप्त झाली असती असा दावा देखील आशिष देशमुख यांनी केला. 

Ayodhya Ram Mandir : ठाण्यातून पहिली आस्था ट्रेन अयोध्याच्या दिशेने रवाना..

Maharashtra News LIVE Updates : ठाण्यातून पहिली आस्था अयोध्या स्पेशल ट्रेन ठाणे भाजपच्या वतीने ठाणे ,नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी हून ट्रेन मधील रामभक्त यांना निरोप देण्यासाठी भाजप आ.निरंजन डावखरे,माजी खासदार  विनय सहस्त्रबुद्धे,माजी खासदार संजीव नाईक,जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सात हे पूर्ण पने फुलांनी सजवण्यात आले आहे. तब्बल 140 फूट 900 किलो फुले वापरून  दोन दिवस एक रात्र जागून एक भला मोठा हार तयार करण्यात आला असून हा हार  रेल्वेच्या इंजिनला लावण्यात आला 1664 लोक ठाण्यातून अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रवाना झाले. यावेळी उत्साहच वातावरण मोठ्या प्रमाणात तरुण वर्गामध्ये दिसायला बघितला मिळाल ढोल ताशाचा गजरात रामभक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ठाण्यातून अयोध्येला निघाले.

Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, बुलढाण्यात शोले स्टाईल अंदोलन

Maharashtra News LIVE Updates : बुलढाणा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधील् आरक्षणाची अमल बजावणी करा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 11 दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे. प्रशासनाने अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष केले असल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळी धनगर समाजाचा एक व्यक्ती  BSNL  टॉवर वर  चढला असून शोले स्टाईल आंदोलन करीत आहे. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली आहे . सिद्धू नरोटे असे या टावर वर चढणाऱ्या व्यक्तीचे आहे...

Rohit Pawar : रोहित पवारांची आज ईडी चौकशी

Maharashtra News LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी शीखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप आहेत. यापूर्वी रोहित पवारांची 24 जानेवारीला 12 तर 1 फेब्रुवारीला 8.30 तास झालीय ईडी चौकशी झाली. आज रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र ईडीने मागितली आहेत. आजही ईडीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.

Wardha : असुविधांना कंटाळून राहिवास्यांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला डांबले

Maharashtra News LIVE Updates : हिंगणघाट येथे म्हाडा इमारतीमधील गाळ्याची विक्री व देखरेख करणाऱ्या कंत्राटदाराला रात्री कार्यालयाच्या आवारात गेटला कुलूप ठोकून डांबून ठेवल्याची घटना घडली आहेय. येथे राहायला आलेल्या पंचवीस राहिवाश्यांचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन या कंत्राटदाराने बिल न भरल्याने कापले गेले. त्यामुळे येथील  राहिवाश्यानी रोष व्यक्त केला आहे. तब्बल पाचशे चौतीस गाळ्यांची ही म्हाडाची इमारत असून येथे राहायला येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जे येथे आले त्यांना सुविधांच दिल्या गेल्या नाहीत. येथील महिलांनी पुढाकार घेत कंत्राटदार जितेंद्र कामत याला जाब विचारला, त्याला डांबून ठेवत आपल्या समस्यांकडे राहिवास्यांनी लक्ष वेधले आहे. रात्री तब्बल पाच तास डांबून ठेवल्यानंतर हिंगणघाट येथील पोलिसांच्या मध्यस्थीने या कंत्राटदारांची सुटका करण्यात आली आहेय.  गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिक पाणी आणि विजेपासून वंचित आहेय. हिंगणघाट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या म्हाडा च्या इमारतीमध्ये गाडे वितरित झालेले रहिवासी येथे राहायला आले, पण येथे सुविधाच नसल्याने अधिकारी आणि कंत्राटदारापुढे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचलाय. कंत्राटदार सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

Rajan Salvi : एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

Maharashtra News LIVE Updates :  रत्नागिरी एसीबीनं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आपला पत्नी आणि मुलगा यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. पण, तो फेटाळला गेला. त्यानंतर साळवी यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली असून त्यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी 12 नंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळणार का? हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रायगड एसीबीसह रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी आतापर्यंत सात वेळा हजर राहिले आहे. त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती देखील सादर केली आहे. आत्तापर्यंत साळवी यांचा भाऊ, पुतण्या, पत्नी, मुलगा, स्वीय सहाय्यक यांची चौकशी झाली आहे. 

Nashik - मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 

Maharashtra News LIVE Updates : मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात दौरा करणार आहेत.  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. यावेली मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.  साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचेही दर्शन घेणार आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.