Amit Thackeray Sada Sarvankar Meet मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. राज्यभरातील मतदार मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहे. याचदरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघाचे (Mahim Vidhan Sabha) मनसेचे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची भेट झाली.
सदा सरवणकर मतदान करण्याच्या आधी सिद्धिविनायक मंदीराच्या दर्शनसाठी गेले होते. यादरम्यान अमित ठाकरे देखील यावेळी सिद्धिविनायक मंदीराच्या दर्शनसाठी दाखल झाले होते. यावेळी सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंची भेट झाली. यादरम्यान दोघांनीही हात मिळवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर अमित ठाकरे म्हणाले की पहिल्यांदा सदा सरवणकरांची भेट झाली. यावेळी मी त्यांना शुभेच्छआ दिल्या. त्यांनीदेखील मला शुभेच्छा दिल्या. 23 नोव्हेंबरला कोणाचा विजय होणार, हे समोर येईल, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र- एकनाथ शिंदे
काही गोष्टींची वेळेवर चर्चा होणे आवश्यक असते. काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आमच्यात कधीही वाद होऊ नये अशी माझी इच्छा असते आणि हीच त्यांची देखील असते. राज ठाकरेंसोबत आमच्यात मतभेद किंवा विसंवाद नाही. पण राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंची भावनिक साद-
मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला. त्यात होत वाचा आणि थंड बसा मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा...1985 साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले ,त्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. लोकसत्ता, सामनामध्ये देखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचं विचार का आला तर याची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी केली. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली , अनेक आमदार झाले. पण यंदा जे आधी घडले नाही ते आता घडतंय, आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय, अशी भावनिक साद मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घातली.