Unhappy Leave : कर्मचाऱ्याने कंपनीसाठी चांगलं काम करावं आणि ऑफिसमधील वातावरण चांगलं राहावं, यासाठी एका कंपनीने 'अनहॅपी लीव्ह' (Unhappy Leave) देण्यास सुरुवात केली आहे. एका बिझनेस टायकूनने 'अनहॅपी लीव्ह' ही संकल्पना जाहीर केली आहे. एका चिनी व्यावसायिकाने 'नाखूष रजा' कर्मचाऱ्यांसाठी 'अनहॅपी लीव्ह'ची (Unhappy Leave) घोषणा केली आहे, त्यामुळे तुम्ही खूश नसाल, तर तुम्हाला कामावर येण्याची गरज नाही.
तुम्ही दु:खी असाल, तर ऑफिसला सुट्टी घ्या
कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना अंमलात आणली आहे. या योजनेनुसार, कर्मचारी आनंदी नसतील, तर त्यांनी कामावर येण्याची गरज नाही. अशा नाखूष कर्मचाऱ्यांनी सुट्टी घ्यावी. नवीन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना आनंद वाटत नसेल, तर ते कामापासून दूर राहू शकतात. तुम्ही दु:खी असाल, तर ऑफिसला सुट्टी घेऊ शकता.
'या' कंपनीने सुरु केली Unhappy Leave
चीनमधील एका बिझनेस टायकूनने 'अनहॅपी लीव्ह' ही संकल्पना जाहीर केली आहे. ऑफिसमध्ये अधिक चांगलं काम व्हावं आणि कर्मचाऱ्यांचं काम आणि जीवन यामध्ये संतुलन राहावं यासाठी, कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दहा अतिरिक्त रजा Unhappy Leave जाहीर केल्या आहेत. चीनमधील पँग डोंग लाई कंपनीने अनहॅपी लीव्ह जाहीर केली आहे.
कर्मचाऱ्यांना Unhappy Leave घेता येणार
गेल्या महिन्यात 2024 चायना सुपरमार्केट सप्ताहादरम्यान, चीनच्या हेनान प्रांतात स्थित पँग डोंग लाई कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष यू डोंगलाई यासंबधित घोषणा केली होती. यावेळी त्यांनी जाहीर केलं की, जेव्हा कर्मचारी ऑफिसमध्ये येण्याच्या मानसिक किंवा भावनिक स्थितीत नसतील, तेव्हा कर्मचारी अतिरिक्त रजेसाठी पात्र असतील. अशा वेळी ते अनहॅपी लीव्ह घेऊ शकतात.
कंपनीच्या मालकाने काय म्हटलं?
पँग डोंग लाय (Pang Dong Lai) कंपनीचे मालक (Yu Donglai) यू डोंगलाई यांनी सांगितलं की, कर्मचाऱ्यांनी विश्रांती घेण्याचे मार्ग स्वतःचं ठरवले पाहिजेत आणि कंपनीने या सरावाला प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल तर वाढेलच, शिवाय उत्पादकता देखील वाढेल. यासोबतच काम आणि जीवन याचील महत्त्वपूर्ण संतुलन साधता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :