Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. एकुण 10 विधानसभा मतदारसंघात 3र हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरूवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत आहे. पहिल्या तासामध्ये अगदी 85 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी दिसून आली.
निवडणूक विभागाकडून जेष्ठ नागरिकांना मतदान केल्यानंतर प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येत आहे.
जिल्हयात ऐंशी हजाराहून अधिक जेष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत.
त्यापैकी 4430 मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात 80 टक्क्यांच्या पुढे जात जिल्ह्याची मतदान टक्केवारी राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज कोल्हापूर येथे मतदान केलेल्या प्रथम मतदारांना श्यामची आई पुस्तक भेट देण्यात आले.
शिरोळ तालुक्यातील घालवाड गावातील मतदान केंद्रावर जिल्ह्यातील पहिल्या 85 पेक्षा वय वर्ष जास्त असलेल्या महिला मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला.
मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर हेल्पलाइन’ या अॅपवर तुम्हाला मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र लगेच शोधता येणार आहे.
जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरीक्त पुढील 12 कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील.