एक्स्प्लोर

शरद पवारांसमोर राडा करणारे शेखर गोरे काय म्हणतात?

"आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

फलटण (सातारा) : शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे शरद पवारांनी भाषण थांबवलं. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी 'सर्व सांगा, खरं सांगा', असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले. VIDEO | शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा | सातारा | एबीपी माझा सर्व प्रकरणावर राडा करणारे कार्यकर्त्ये शेखर गोरे यांची प्रतिक्रिया "आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत," असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. आज कार्यकर्त्यांसोबत शेखर गोरे कार्यक्रमास्थळी आले होते. शरद पवारांच्या भाषणापूर्वी आमच्यापैकी एका कार्याकर्त्यांला भाषणाची संधी द्यावी असं आम्ही स्टेजवरील नेते मंडळींना लिहून दिलं होतं. आम्हाला आमच्यावर झालेला अन्याय पवार साहेंबांसमोर मांडायचा होता. परंतू आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं नाही. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून मला उभ केलं होतं. मात्र निवडणूकीत राष्ट्रवादीकडे 127 मतं जास्ता असताना जर माझा पराभव होतो. हा माझ्यावर होणारा अन्याय आहे. साहेबांना निवडणूकीत पूर्ण पाठिंबा आहे. पण जर मला माण तालुक्यातं नेतृत्व दिलं असताना मला व्यासपीठावर बोलू दिलं जातं नाही हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. मी माझं नेतृत्व वेळावेळी सिद्ध केलं असतानाही मला साहेबांना भेटू दिलं गेलं नाही. म्हणूनच मला माझ्यावरील अन्याय पवार साहेबांसमोर मांडायच्या होत्या. VIDEO | शरद पवारांसमोरच राडा करणारे कार्यकर्त्ये शेखर गोरे यांच्याशी बातचीत | सातारा | एबीपी माझा कोण आहेत शेखर गोरे? माण तालुक्यातील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा शेखर गोरे यांच्यावर आरोप होता. गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. इतरही काही गुन्हे त्यांच्यावर नोंद होते. तेव्हापासून शेखर गोरे फरार झाले. जवळपास एक वर्षभर ते फरार होते. स्थानिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंततर जिल्हा न्यायालय आणि पुढे मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी जामीनासाठी प्रयत्न केला. उच्च न्यायालयाने त्यांना कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आणि माण तालुक्यात जायला बंदी घातली. काही दिवसांपूर्वी...म्हणजे मागील महिन्यात शेखर गोरे पोलिसांसमोर हजर झाले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली आणि वडूज या खटाव तालुक्यातील न्यायलयात हजर केले. तिथे त्यांना लगेच जामीन मिळाला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याकडे माण तालुक्याच नेतृत्व सोपवलं होतं. कॉंग्रेसचे माण तालुक्यातील आमदार जयकुमार गोरे यांचा सख्खा भाऊ असलेल्या शेखर गोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने फोडलं आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात बळ दिलं. मात्र 2014 ची निवडणूक ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करुन त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. मात्र त्यामधेही कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. मागील वर्षभरापासून पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे होता. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांना दिलासा मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget