Ncp National Executive : राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; कोणाला मिळालं स्थान?
Ncp National Executive : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर (Ncp National Executive ) केली. यामध्ये काही जुन्या पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आलाय. तर काही नवी चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. नव्या कार्यकारिणीत नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड झाली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#NCPNationalCommittee pic.twitter.com/gd2rx7X6Pf
— NCP (@NCPspeaks) September 16, 2022
नव्या कार्यकारिणीनुसार, राजीव झा, हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय पदाधिकारी
1. शरद पवार - राष्ट्रीय अध्यक्ष
2. प्रफुल्ल पटेल - राष्ट्रीय उपाध्यक्ष
3. सुनील तटकरे - राष्ट्रीय सरचिटणीस
4. योगानंद शास्त्री - राष्ट्रीय सरचिटणीस
5. के. के. शर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
6. पीपी मोहम्मद फैजल - राष्ट्रीय सरचिटणीस
7. नरेंद्र वर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
8. जितेंद्र आव्हाड - राष्ट्रीय सरचिटणीस
9. वाय. पी. त्रिवेदी - राष्ट्रीय कोषाध्यक्ष
10. एस. आर. कोहली - स्थायी सचिव