(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mla Nitin Pawar : विकास कामांसाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाणं महत्वाचं, अजितदादा घेतील तो निर्णय मान्य; आमदार नितीन पवारांचं सूचक वक्तव्य
Mla Nitin Pawar : विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षासोबत जाणं महत्वाचं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार (Mla Nitin Pawar) यांनी केलं.
Mla Nitin Pawar on Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar) जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य आहे. विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षासोबत जाणं महत्वाचं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार (Mla Nitin Pawar) यांनी केलं. मागच्या वेळी पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीच माघार घ्यायला नको होती. भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकारच पुढे चालू राहायला पाहिजे होते असंही नितीन पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आलं आहे.
जनता बदल स्वीकारुन घेईल
अजित पवार हे सिनियर नेते आहेत, त्यामुळं त्यांच्या बाबतीत सातत्यानं चर्चा घडत असल्याचे आमदार नितीन पवार म्हणाले. मागच्या वेळी पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीच माघार घ्यायला नको होती. विकास कामासाठी सत्ताधारी पक्षा सोबत जाणं महत्वाचे असते. जनतेला पक्ष नाही विकासकामे पाहिजेत. जनता बदल स्वीकारुन घेईल असेही सूचक वक्तव्य नितीन पवार यांनी केलं आहे. आमदार नितीन पवार हे मुबंईला रवाना झाले आहेत. कोणताही निरोप नाही, मात्र तरीही पवारसाहेब, अजितदादा, जयंत पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नितीन पवार म्हणाले. नितीन पवार यांच्यासोबतच आमदार आण्णा बनसोडे तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांनीदेखील अजित पवार जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
आमदारांची बैठक बोलावल्याची जोरदार चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या अजित पवार (Ajit Pawar) केंद्र बिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे. प्रत्येकजण आपल्या खासगी कामासाठी निघाल्याचं सांगतायत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला खतपाणी घालत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिले आहे. आज मी आमदारांची कोणताही बैठक बोलावली नाही. एवढंच नाही तर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
महत्त्वाच्या बातम्या: