(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजितदादांकडे 55 गायीचा गोठा, देखभाल करायला 'उत्तम' माणसाची गरज, मिटकरींचा उत्तम जानकरांना टोला
उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Amol Mitkari on Uttam Jankar : उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तमरावांनी बारामतीमध्ये यावं. अजितदादांच्या फॉर्ममध्ये 55 गाईंचा मुक्त गोठा आहे. सध्या या गायींची देखभाल करायला एका "उत्तम" माणसाची जागा रिक्त आहे, असा टोला मिटकरींनी उत्तम जानकरांनी लगावलाय. जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
उत्तमरावांनी बारामती मध्ये यावं. अजितदादांच्या या फॉर्म मध्ये 55 गायीचा मुक्त गोठा आहे. सध्या गायीची देखभाल करायला एका "उत्तम" माणसाची जागा रिक्त आहे. तुमची इच्छा असेल तर सालगडी म्हणुन "उत्तम "काम करता येईल. तसेही तुतारीवाले गोठा साफ करायलाच ठेवणार होते. इथं लायकीचं काम मिळतं, अशी टीका मिटकरींनी उत्तम जानकर यांच्यावर केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते उत्तम जानकर?
अजितदादा कधीच नेता नव्हते आणि होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गायी, होस्टेन ,बंगलोरी अशा गायीचे चांगले पैदास केंद्र सुरु करावेत यात ते यशस्वी होतील असे उत्तम जानकर म्हणाले होते. दादांना राजकारणातले काही सुद्धा कळत नसले तरी ते धंद्यात हुशार आहेत. त्यांचा हा गोठा देशपातळीवर चांगला होईल आणि त्या गोठ्याला भेट देण्यासाठी मी देखील जाईन अशा शब्दात उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. आता त्यांच्या या टीकेवर मिटकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांच्या फार्ममध्ये गायींची देखभाल करण्यााठी उत्तम सालगड्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत.
जे लहान मुलाला कळते ते अजित पवार यांना काळात नाही
जे लहान मुलाला कळते ते अजित पवार यांना काळात नाही, म्हणजेच ते राज्याचे काय बारामतीचे देखील नेते होऊ शकत नाहीत. अजित पवार कधीच नेते नव्हते, त्यांच्यात ते गुणचं नाहीत अशी टीका जानकरांनी केली होती. ऐन निवडणुकीत अजितदादा यांची साथ सोडून उत्तम जानकर यांनी माढा , सोलापूर आणि बारामतीमध्ये जोरदार प्रचाराची राळ उडवत धनगर समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार यांच्यामागे उभी केली होती . त्यामुळे माढा, सोलापूर आणि बारामती या तीनही मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा झाला.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : दादा धंद्यामध्ये हुशार,'उत्तम' पैदाशीची जनावरं घ्यावी, जानकर अजितदादांवर कडाडले