तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, मिटकरींचा हल्लाबोल
आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटक पक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे.
Amol Mitkari on Tanaji Sawant : आता बस्स झालंय... आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटक पक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे. त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था? हे ज समजत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
अमोल मिटकरी हे अकोला येथे 'एबीपी माझा"शी बोलत होते. यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आता या दोन्ही पक्षांच्या लोकांना आवर घालावा. नाहीतर आता आमचा संयम सुटेल असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाला दिला. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था?, हे ज समजत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी लगावलाय.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा
दरम्यान, तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election 2024) महायुतीतील (Mahayuti) धुसपूस समोर आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी केलीय.
महत्वाच्या बातम्या:
तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; अजितदादा गटाचा नेता संतापला