एक्स्प्लोर

OBC Reservation: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय,  जयंत पाटील यांची टीका

OBC Reservation: केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, असं विरोधी विधान केलं. आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही, या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपच्या आहेत.

OBC Reservation:  ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून  भाजपने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही भाजप नेत्यांकडून केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ओबीसी आरक्षणाबाबतचा इमपरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे,  त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचं विधान केले होतं. आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, असं विरोधी विधान केलं. आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही, या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपच्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय, असे जयंत पाटील म्हणाले. 

ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार  कुठे कमी पडणार नाही, मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे. म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचा आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपी मध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते . मुंबईहून डोंबिवली असा त्यांनी ट्रेन ने प्रवास केला .डोंबिवलीत कार्यक्रमस्थळी आल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप वर  टीका केली .

मेरिट च्या मुलांवर अन्याय  होऊ नये ,परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न  -
सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील यानी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला .  एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते मात्र काही एजन्सी ब्लॅक लिस्ट आहेत, काही एजन्सी याचा गैरफायदा घेणारे आहेत फार कमी एजन्सी आहेत  सक्षम करण्यास परीक्षा देऊ शकतात .दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली .याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा  निर्णय घेतला .मेरिट च्या मुलांवर अन्याय  होऊ नये ,परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे. 

येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार  -
गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला होता आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादी सेना इच्छुक आहेत मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल असं स्पष्ट केलं तर नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला व महाविकास आघाडी झाली तर भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
Malegaon Election Result 2025: माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
Sanjay Raut on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
Malegaon Election Result 2025: माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
Sanjay Raut on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
वारी सुरु असताना मला दिलासा मिळाला, आंधळ्याच्या गाई देव राखी, त्यामुळे माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा; ईडीच्या तावडीतून सुटका होताच हसन मुश्रीफांची कळी खुलली
वारी सुरु असताना मला दिलासा मिळाला, आंधळ्याच्या गाई देव राखी, त्यामुळे माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा; ईडीच्या तावडीतून सुटका होताच हसन मुश्रीफांची कळी खुलली
Jalgaon News : शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
Hasan Mushrif: किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
Shaktipeeth expressway: मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
Embed widget