एक्स्प्लोर

महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा : शरद पवार

ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Workers Strike Live) अद्यापही तोडगा निघालेला नाही. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

सातारा : ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Workers Strike Live) अद्यापही तोडगा निघालेला नाही. याबाबत सरकारसोबत आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक सुरु आहे. दुसरीकडे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. एसटी आंदोलनावर बोलताना शरद पवार म्हणाले की, म्हणाले की, एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीबाबत सर्वसामान्यांचं मतही महत्वाचं आहे. एसटीचं विलिनीकरण केल्यावर अनेक मंडळांचं विलिनीकरण करावं लागेल, असंही पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा, असंही पवार म्हणाले. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर बोलणार नाही. मात्र एसटीचा संप चर्चेतून सुटू शकतो, असंही ते म्हणाले. 

आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. 

त्यांनी म्हटलं की, एसटी विभागाची आढावा बैठक घेतली नाही. मात्र एक बैठक घेतली होती.  या बैठकीत काही पर्याय सुचवले होते.  याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती.  500 कोटी रुपयांची मदत ही राज्य सरकारने पगारासाठी मदत केली होती. पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे. त्यामुळं यात काही मार्गे काढता येईल का हा एक विषय आहे, असंही ते म्हणाले. पवार म्हणाले की, या आंदोलनाने युनियनचे अधिकार ठेवले नाहीत. त्यामुळे करार करताना नेमका कोणाशी करावा हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. 

शशिकांत शिंदेंनी जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती : शरद पवार

शरद पवारांनी म्हटलं की, शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही मात्र ही निवडणूक शिंदे यांनी अधिक गांभीर्यानं घेणं  अपेक्षित होतं, असं पवार म्हणाले. सरकारी संस्थाच्या निवडणुका पक्ष घेत नसतो, असंही ते म्हणाले. तरुण मुलं आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी मिळावी अशी मतदारांची इच्छा असणार असं ते म्हणाले. 

कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयावर पवार म्हणाले...

कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले की, कृषी कायदे मागे घेतल्यामुळे जर नुकसान झालं असेल तर मग का मागे घेतले? केंद्र सरकारच्या संदर्भात नाराजी होती की राज्याचा प्रश्न असताना त्यांना विश्वासात घेतलं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात धोरण ठरवताना त्यांची चर्चा सदनात होत नाही. काही दिवसांत शेजारच्या राज्याच्या निवडणुका आहेत. निवडणुकांमध्ये कसं होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Jaykumar Gore: पांडुरंग, वारकरी अन् भक्तांपेक्षा कुणीही मोठा नाही, मंत्री अन् आमदारांची माफी, पण VIP दर्शनाबाबत कोणतेही कॉम्प्रमाईज नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंची ठाम भूमिका
पांडुरंग, वारकरी अन् भक्तांपेक्षा कुणीही मोठा नाही, सहकारी मंत्री आणि आमदारांची माफी, पण VIP दर्शनाबाबत कोणतेही कॉम्प्रमाईज नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंची ठाम भूमिका

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Embed widget