एक्स्प्लोर
Advertisement
अन्यायाची समज यायला उदयनराजेंना 15 वर्षे लागली : शरद पवार
राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असताना आपली कामं झाली नाही असं म्हणणाऱ्या उदयनराजे भोसले यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगणाऱ्या उदयनराजेंना समज यायला 15 वर्ष लागले याचे विशेष वाटते, असा टोला पवारांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर काल(रविवार) उदयनराजेंनी साताऱ्यात बोलताना "आयुष्यातील 15 वर्ष मी घालवले. सत्ता असताना 15 वर्षात मी कुठली फाईल घेऊन गेलो तर ती फाईल डस्टबिनमध्ये जायची", अशी टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केली होती. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. 'उदयनराजे यांना समज येणास 15 वर्ष लागले, याचे विशेष वाटते.
अन्याय होतो असे आधी का नाही कळाले?' असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-भाजपची वाट धरणाऱ्या नेत्यांवरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ईडी एसीबीच्या नोटीस आल्यात, म्हणून लोक सत्ताधारी पक्षात जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रातील सभा झाल्यावर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असा अंदाज असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement