राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक सुरु, अजित पवारांसह बडे नेते उपस्थित, कोणत्या विषयावर चर्चा सुरु?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली आहे.

Ncp Meeting : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली आहे. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ उपस्थित आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सध्या महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणारे प्रवेश यामुळे महायुतीत आगामी काळात वाद होण्याची शक्यता याबाबत वाद होण्याची शक्यता या विषयावर चर्चेची शक्यता
राज्य निवडणूक आयोगानेही महत्वाची बैठक बोलवली
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांपासून अगदी ग्राम पंचायतीपर्यंत सर्वांचाच कारभार हा प्रशासकाच्या माध्यमातून राबवला जात आहे. शिवाय निवडणुकींची तयारी करणाऱ्या अनेकाना केवळ प्रतिक्षाच करावी लागत आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका घेण्यासाठी सरकारने ही तयारी दर्शवली आहे. त्यात आता राज्य निवडणूक आयोगानेही महत्वाची बैठक बोलवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक (Election) पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोगानेही महत्वाची बैठक बोलवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 हाच या बैठकीचा विषय आहे. येत्या 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकी बाबत निवडणूक आयोगाला काही तरी ठोस करता येणार आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत मात्र, त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी हळूहळू तयारीला सुरुवात केली आहे. महायुती या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळं महाविका आघाडीतील तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणका एकत्र लढणार का? याबाबत संभ्रम आहे.
महत्वाच्या बातम्या:
























