एक्स्प्लोर

Navratri 2021 : घटस्थापना म्हणजे शास्त्रशुद्ध बीजपरीक्षण; काय आहे महत्व?

Shardiya Navratri 2021 :  घटस्थापनेचा (Ghatsthapana) संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे पिकांचं  शास्त्रशुध्द बीजपरीक्षण होय. 

Shardiya Navratri 2021 : घटस्थापना, नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे शास्त्रशुध्द बीजपरीक्षण होय. 

घटस्थापनेला आपल्याकडील कृषी संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. घटस्थापना म्हणजे प्राचीन कृषी संस्कृतीतला महत्वाचा दिवस. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदाला आणि उत्साहाला भरती आलेली असते. 

घरी आलेल्या धान्याचं मग शास्त्रशुद्ध परीक्षण केलं जातं. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा करुन एकप्रकारे त्याप्रति भक्तीभाव प्रकट केला जातो.  

आज राज्यातला बळीराजा प्रलयकारी पावसामुळे मोठ्या संकटात आहे. राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात निसर्गाचा कोप होतोय, मग तो पूराच्या रुपात असो वा दुष्काळाच्या रुपात. तरीही किमान उद्याचा काळ तरी आपल्या आयुष्यात नवचैतन्य, समृद्धी आणि स्थिरता घेऊन येईल या आशेवर आजच्या घटासाठी, सृजनोत्सवासाठी  शेतकऱ्याची यथाशक्ती धडपड असेलच. 

यंदा नऊ नाहीतर 8 दिवसांचा नवरात्रोत्सव
शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु होऊन 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. परंतु, नवरात्रीमध्ये 9 दिवसांपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातंय की, या दिवसांत देवीचं व्रत आणि पूजा अर्चना केल्यानं देवी स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांचं दुःख हरण करते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं.  

शारदीय नवरात्र यंदाच्या वर्षी गुरुवारी सुरु होऊन, गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवस साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. 7 ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष एकमपासून सुरु होऊन दुर्गा महानवमी 14 ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत कांग्रेसची होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Embed widget