एक्स्प्लोर

Nagpur Crime: नवोदय बँक घोटाळ्यात अपहार करणारे जोशी बंधू तीन वर्षांपासून फरारच, ठगबाजांना शोधण्यात स्मार्ट नागपूर पोलीस अपयशी

शहरातील जनता चौकातील एका बिल्डिंमधील फार्मा कंपनीचे कार्यालय असून याठिकाणीही जोशी बंधूंची आर्थिक देवाण-घेवाण चालत असल्याची माहिती आहे. मात्र ही माहिती पोलिसांना अद्याप मिळाली नाही हे विशेष.

Nagpur Crime News : नवोदय बँक घोटाळ्यात सर्वाधिक पैशांचा अपहार करणाऱ्या जोशी बंधूंना शोधून काढण्यात नागपूरचे स्मार्ट पोलीस अपयशी ठरत आहेत. या प्रकरणात जोशी बंधू तीन वर्षांपासून फरार आहेत. आतापर्यंत त्यांचा कोणताही सुगावा पोलीसांना न लागणे आश्चर्यकारकच आहे. केवळ नवोदय बँकच नाहीतर जोशी बंधूंनी अनेकांची फसवणूक केली आहे. लोक न्यायासाठी भटकत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळताना दिसून येत नाही. विजय कैलाश जोशी, मुकेश कैलाश जोशी, राकेश कैलाश जोशी आणि विकेश कैलाश जोशी अशी आरोपींची नावे आहेत. विकेशला नवोदय बँक घोटाळ्यात जामीन मिळाला आहे, तर इतर भावंड अद्यापही पोलीसांच्या (Nagpur Police) हाती लागलेले नाही.

विकेशने अनेक व्यावसायिकांना जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. यातीलच एक राहुल जैन (वय 38) रा. परवारपुरा, इतवारी यांना तर विकेशने सशर्त जामीन मिळाल्यानंतर चुना लावला आहे. एका मित्राच्या माध्यमातून राहुलची विकेशशी ओळख झाली होती. विकेशने मैत्री वाढवली आणि घरी येणे-जाणे सुरू केले. दरम्यान विकेशने पैशांची आवश्यकता असल्याने तो त्याचे पारडीच्या पुनापूर परिसरातील घर स्वस्त किंमतीत विकत असल्याचे राहुलला सांगितले. राहुलने त्याचे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. 15 लाख रुपयात घराचा सौदा झाला. मात्र पैसे घेतल्यानंतर विकेश टाळाटाळ करू लागला. नंतर प्रॉपर्टीचे भाव वाढल्याचे सांगून 30 लाख रुपयात दोन रजिस्ट्री करून दिल्या. काही दिवसांनी समजले की, तेच घर विकेशने इतर दोन जणांना आधीच विकले आहे. तसेच ते घर मनीषनगरच्या पीएनबी बँकेत गहाणही ठेवले आहे. राहुलने पैसे परत मागितले असता खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. राहुलच्या तक्रारीवरून पारडी पोलीसांनी 24 डिसेंबर 2021 ला विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. अशाच प्रकारे विकेश जोशी आणि त्याची वहिणी कोमल जोशीने राहुलची कारही हडपली. मेडिकल इमर्जन्सी असल्याचे सांगून ते राहुलची कार मागून घेऊन गेले आणि एका भंगारवाल्याला विकली. पैसे अडकून असल्याने राहुल त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकण्यास बाध्य होते. लकडगंज पोलीसांनी विकेश आणि कोमल विरुद्ध 30 मे 2022 ला गुन्हा नोंदविला होता.

अनेक व्यावसायिकांना अडकवले जाळ्यात

राहुल यांनी सांगितले की, विकेश आणि त्याच्या भावंडांनी अनेक व्यावसायिकांना चुना लावला आहे. शांतीनगरचा मुस्तू आणि सक्करदराचा बबली त्यांच्यासाठी काम करतात. वेगवेगळी कारणे सांगून जोशी बंधू लोकांकडून पैसे घेतात आणि नंतर फरार होता. विकेश विरुद्ध तहसील ठाण्यात नोंद एका प्रकरणात वॉरंट निघालेला आहे. आश्चर्य म्हणजे तो फरार राहून लोकांची फसवणूक करीत आहे. जोशी बंधू पोलीस विभागात अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून लोकांना धमकावतात. कोणी पैसे परत मागण्याची हिंमत केली तर खोटी तक्रार करतात. त्यांना अटक झाली तर अनेक व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येतील. नवोदय बँक घोटाळ्यात सर्वाधिक पैसे जोशी बंधूंनीच बुडवले होते. त्यानंतरही पोलीस त्यांना शोधण्यात अपयशी ठरणे आश्चर्यकारक आहे. मुस्तू आणि बबलीला पकडल्यास विकेश जोशीचा सुगावा लागू शकतो. शहरातील काही गुन्हेगारही त्यांच्याशी जुडून आहेत. पैसे मागणऱ्यांना गुंडांकडून धमकावले जाते.

'त्या' बिल्डिंगमधील तो फ्लॅट कोणाचा?

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी तलाव परिसरातील एका मोठ्या बिल्डरच्या फ्लॅट प्रोजेक्टमध्ये जोशी बंधू कोरोना काळापासून वास्तव्यास होता. हे फ्लॅट गणेशपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. याठिकाणी त्याच्या खास मित्रांचेही येणे-जाणे होते. याशिवाय युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील नागपूरातील 'आंदोलक' म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेत्याचीही इथे बैठक होती. तसेच या नेत्याच्या सोशल मीडिया आणि पीआरचे कामही याच फ्लॅटमध्ये विकेशने बैठक घेऊन फायनल केले होते. मात्र तीन महिने काम केल्यावरही ठरलेले मानधन मिळाले नसल्याने संबंधीत व्यक्तीने या नेत्याचे काम बंद केले होते. यावेळी नेत्याने त्या पीआर सांभाळणाऱ्या व्यक्तीला 'माझे पैसेही विकेशने बुडवले' असल्याचे संबंधिताला सांगितले होते. याशिवाय शहरातील जनता चौकातील एका बिल्डिंमध्ये पहिल्या माळ्यावर एका फार्मा कंपनीचे कार्यालय असून याठिकाणीही जोशी बंधूंची आर्थिक देवाण-घेवाण चालत असल्याची माहिती आहे. मात्र ही माहिती स्मार्ट नागपूर पोलीसांना अद्याप मिळाली नाही हे विशेष.

ही बातमी देखली वाचा...

बायकोच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पतीसह सासूचा मृत्यू, नागपूरातील धक्कादायक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget